पिंपरी : चिखलीतील घरकुलमध्ये कोरोनाचे रुग्ण उपचारासाठी येणार होते, मात्र... 

पिंपरी : चिखलीतील घरकुलमध्ये कोरोनाचे रुग्ण उपचारासाठी येणार होते, मात्र... 

पिंपरी : चिखली येथील घरकुल वसाहतीच्या आवारातील चार इमारतींमध्ये बुधवारपासून महापालिकेच्या वतीने कोरोनाचे रुग्ण उपचारासाठी येणार होते. मात्र, गुरुवारी दुपारपर्यंत रुग्ण न आल्याने स्थानिक नागरिकांनी सध्या तरी सुटकेचा नि:श्‍वास सोडला आहे. 

घरकुल वसाहतीमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना उपचारासाठी आणण्यास स्थानिक नागरिकांचा तीव्र विरोध आहे. त्यासाठी चार-पाच दिवसांपूर्वी स्थानिक नागरिकांनी मूक आंदोलनही केले होते. त्यावेळी चिखली पोलिस ठाण्याचे निरीक्षक सतीश माने आणि चार-पाच पोलिस घटनास्थळी आले. त्यांनी नागरिकांची समजूत काढून आंदोलन न करण्याविषयी समज दिली. तसेच यासंदर्भात प्रशासनाशी चर्चा करून मार्ग काढण्याचे आश्‍वासन दिले.

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोना रुग्णांमुळे संसर्ग होण्याची भीती वाटत आहे. तसेच त्यांच्या रोजगारावरही परिणाम होण्याची शक्‍यता त्यांना वाटते. त्यामुळे त्यांचा पॉझिटिव्ह रुग्णांना तेथे आणण्यास तीव्र विरोध आहे. घरकुल वसाहतीच्या बाजूने या चार इमारतींना पत्रे लावण्यात आले आहेत. तर रुग्णांना ने-आण करण्यासाठी पुढच्या बाजूने गेटची व्यवस्था करण्यात आली आहे. या चार इमारतींमध्ये वायरिंग करणे, बल्ब लावण्याची कामे सुरू आहेत. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

यासंदर्भात स्थानिक नागरिक शांताराम खुडे यांनी सांगितले, "अद्यापपर्यंत कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण उपचारासाठी घरकुल परिसरात आणण्यात आलेले नाहीत. मात्र महापालिकेच्या वतीने चार इमारतींमध्ये दुरुस्तीची कामे सुरू आहेत. येथे रुग्ण आणण्यास आमचा विरोध आहे.'' 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com