चिखली पोलिस ठाण्यातील उपनिरीक्षकाला लाच घेताना पकडले

चिखली पोलिस ठाण्यातील उपनिरीक्षकाला लाच घेताना पकडले

पिंपरी : चिखली पोलिस ठाण्यातील एका उपनिरीक्षकाला पाच लाखांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई शनिवारी (ता. 20) सायंकाळी करण्यात आली. 

फारूख सोलापूरे असे पकडलेल्या उपनिरीक्षकाचे नाव आहे. सोलापूरे चिखली ठाण्यांतर्गत असलेल्या एका चौकीत कार्यरत आहेत. दरम्यान, त्यांनी एका प्रकरणात तक्रारदाराकडे पाच लाखांची लाच मागितली होती. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या बाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यानंतर शनिवारी सायंकाळी सापळा रचून सोलापूरे यांना ताब्यात घेण्यात आले. दरम्यान, अद्याप एसीबीच्या पथकाकडून पुढील कारवाई सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com