Chinchawad ByElection: सस्पेन्स कायम? राहुल कलाटे म्हणतात उद्धव ठाकरेंचा अनादर करायचा नाही, पण...

स्वतः राहुल कलाटे यांनी माध्यमांशी संवाद साधत या बैठकीनंतर आपली भूमिका स्पष्ट केली.
chinchwad bypoll
chinchwad bypollesakal

Chinchawad ByElection: चिंचवड पोटनिवडणुकीसाठी अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावा यासाठी शिवसेनेचे संपर्क प्रमुख सचिन अहिर यांनी भेट घेतली. यानंतर स्वतः राहुल कलाटे यांनी माध्यमांशी संवाद साधत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. (Chinchawad ByElection Suspense Continued Rahul Kalate done clear his stand)

chinchwad bypoll
Cervical Cancer Vaccine: सिरमची पहिली स्वदेशी 'सर्व्हिकल कॅन्सर' प्रतिबंधक लस लवकरच बाजारात; खूपच कमी असेल किंमत

राहुल कलाटे म्हणाले, "चिंचवडच्या पोटनिवडणुकीत अर्ज मागे घ्यावा यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा निरोप घेऊन सचिन अहिर मला भेटले. त्यानुसार मला उद्धव ठाकरेंचा अनादर करायचा नाही, पण माझ्या समर्थकांशी चर्चा केल्यानंतर अर्ज मागे घ्यायचा की नाही यावर मी यावर निर्णय जाहीर करेन"

हे ही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

दरम्यान, आज शिवसेनेचे आमदार सचिन आहिर यांनी राहुल कलाटे यांची भेट घेतली. यावेळी आहिर यांनी उद्धव ठाकरेंचा निरोप राहुल कलाटे यांना दिला. त्याचबरोबर उद्धव ठाकरे आणि राहुल कलाटे यांच्यात फोनवरून चर्चाही झाली. आज तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची वेळ आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com