Pimpri News : अपक्ष उमेदवार राहूल कलाटेंच्या कार्यालयापुढे शुकशुकाट

चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत सुरवातीपासूनच चर्चांच्या केंद्रस्थानी असलेल्या तसेच निवडणुकीत रंगत आणणाऱ्या राहूल कलाटे यांच्या कार्यालय आवारात गुरूवारी (ता. २) शुकशुकाट पाहायला मिळाला.
Rahul kalate Office
Rahul kalate Officesakal
Summary

चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत सुरवातीपासूनच चर्चांच्या केंद्रस्थानी असलेल्या तसेच निवडणुकीत रंगत आणणाऱ्या राहूल कलाटे यांच्या कार्यालय आवारात गुरूवारी (ता. २) शुकशुकाट पाहायला मिळाला.

पिंपरी - चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत सुरवातीपासूनच चर्चांच्या केंद्रस्थानी असलेल्या तसेच निवडणुकीत रंगत आणणाऱ्या वंचित पुरस्कृत अपक्ष उमेदवार राहूल कलाटे यांच्या कार्यालय आवारात एरवी असणारी कार्यकर्त्यांनी गर्दी निकालाच्या दिवशी गुरूवारी (ता. २) ओसरल्याने दिवसभर त्यांच्या कार्यालयासमोर शुकशुकाट पाहायला मिळाला.

सकाळी दहाच्या सुमारास काही कार्यकर्ते कार्यालय आवारात जमा झाले. यापैकी काहीजण मोबाईलद्वारे तर काहीजण दुरदर्शनवर मतमोजणीवर लक्ष ठेवून होते. मात्र कलाटे सुरुवातीपासूनच पिछाडीवर होते. मात्र हा फरक येत्या काही फेऱ्यात कमी होईल अशी अपेक्षा कार्यकर्ते बाळगून होते. मात्र दहा फेऱ्यानंतरही कलाटे मागेच राहिले. प्रत्येक फेरी गणिक त्यांचा फरकही वाढत असल्याने हिरमुसलेल्या कार्यकर्त्यांनी हळूहळू काढता पाय घेतला. मात्र पुन्हा संपूर्ण निकाल हाती येताच कलाटे यांच्या समर्थनार्थ सायंकाळी साडे सहा नंतर कार्यकर्त्यांनी पुन्हा गर्दी केली होती.

आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे झालेल्या पोट निवडणूकीत वंचितच्या पाठिंब्यावर राहुल कलाटे यांनी शड्डू ठोकल्याने ही निवडणुक तिरंगी झाली. तत्पूर्वी २०१४ ला शिवसेनेच्या तर २०१९ ला सर्व पक्षिय पाठिंब्यावर लढलेल्या आणि पराभव झालेल्या कलाटेंना शिवसेना ठाकरे गटाचे नेते सचिन आहेर, उद्धव ठाकरे अजित पवार आदींनी समाजविण्याचा प्रयत्न केला. मात्र कलाटे हे माझ्या मागे जनता असल्याचे सांगत निवडणूक लढण्यावर ठाम राहिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com