गणरायाच्या स्वागताला उद्योगनगरी सज्ज; अशी चाललीय खरेदीची लगबग

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 20 August 2020

सर्वांचा लाडका बाप्पा शनिवारी घराघरांत विराजमान होणार आहे.

पिंपरी : सिंहासनावर आरूढ. कमळावर बसलेला बाल गणेश. पंचागकर्ता, अशा गणरायांच्या विविध रूपांनी अवघा रंग एकच झाल्याची अनुभूती बाजारपेठेत फेरफटका मारल्यावर मिळत आहे. बाप्पाच्या आगमनाला अवघ्या एका दिवसाचा कालावधी शिल्लक असताना बाजारपेठेत गणरायाची मूर्ती निश्चित करण्यापासून ते सजावटीचे साहित्य खरेदी करण्यापर्यंत भक्तांची गर्दी झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा मूर्तीच्या किमतीत १५ ते २० टक्क्यांनी वाढ झाली, परंतु भक्तांच्या उत्साहावर त्याचा परिणाम झाला नाही.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शनिवारी (ता. 22) सर्वांचा लाडका बाप्पा वाजतगाजत घराघरांत विराजमान होणार आहे. त्या दृष्टीने सर्वत्र जय्यत तयारी सुरू आहे. बाप्पाला घरी आणण्याची लगबग सुरू होते, ती मूर्ती निवडण्यापासून. मुख्य बाजारपेठेसह वेगवेगळ्या भागात गणेशमूर्तीची दुकाने थाटली गेली आहेत. आतापर्यंत जवळपास ७० टक्के मूर्तीची आगाऊ नोंदणी झाल्याचे विक्रेते सांगतात. पर्यावरणस्नेही गणेशोत्सवाकडे कल वाढल्याने शाडू मातीच्या मूर्तीला अधिक पसंती मिळत आहे. 

Image may contain: 1 person

किमतीत वाढ, तरी उत्साह कायम

गत वर्षांच्या तुलनेत मूर्तीच्या किमतीत १५ ते २० टक्के वाढ झाली आहे. परंतु  खरेदीच्या उत्साहावर त्याचा परिणाम झाला नाही. पावसामुळे मध्यंतरी खरेदीचा वेग काहीसा मंदावला होता. परंतु, अंतिम टप्प्यात गणेशमूर्ती निश्चितीला उधाण आल्याचे चित्र सर्वत्र आहे. 

Image may contain: 1 person, indoor

विविध रूपांत गणेशमूर्ती

मुंबई, कल्याण, पेण, गुजरात यासह ग्रामीण भागातून गणेशमूर्ती शहरात दाखल झाल्या आहेत. १०१ रुपयांपासून ग्राहकाच्या आर्थिक क्षमतेनुसार विविध पर्याय उपलब्ध आहेत. फेटेवाला गणपती, लालबागचा राजा, सिद्धीविनायक, दागिना गणपती, पेशवे बैठक, सावकार बैठक, दगडूशेठ आदी रूपांत मूर्ती आहेत. त्यात दागिना, लालबागचा राजा आणि बाल गणेश या मूर्तीला विशेष मागणी आहे. कार्टुन्स, जय मल्हार किंवा तत्सम प्रतिकृतीवर आधारित गणेशमूर्ती बाजारातून बाद झाल्या आहेत. मूर्ती सजावटीत कलाकारांनी आकर्षकता आणली आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

Edited by Shivnandan Baviskar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: citizens buying ganesh idols at pimpri chinchwad