एसआरए योजनेत संमतीसाठी झोपडपट्टीधारकांना दमदाटी;नगरसेविकांची आयुक्तांकडे तक्रार

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 14 January 2021

झोपडीदादा अथवा भाई येतो आणि संमती पत्रावर सही करण्याची सक्ती करतो.झोपडीधारक पात्र की अपात्र याची खातरजमा न करता सर्रास सह्या घेतल्या जातात.हे सार्वत्रिक चित्र अनेक झोपडपट्ट्यांतून पाहायला मिळते.

पिंपरी - शहरात एसआरएअंतर्गत काही झोपडपट्ट्यांचे पुनर्वसनासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरू आहेत. मात्र, काही राजकीय नेते, दलाल व बिल्डर हे झोपडपट्टी दादांच्या मदतीने अशा संमती पत्रासाठी झोपडीधारकांवर दमदाटीचे प्रकार सर्रास सुरू आहेत. महापालिका प्रशासन, एसआरएचे अधिकारी आणि पोलिसांनी त्याबाबत तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी नगरसेविका सीमा सावळे यांनी आयुक्तांकडे केली आहे. 

Makar Sankranti 2021: मकर संक्रांत आणि पतंगाचं कनेक्शन काय?​

निवेदनात म्हटले आहे, "प्रकल्पांना मंजुरी घेण्यासाठी संबंधित झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांची लेखी संमती ही कायद्यानेच बंधनकारक आहे. ज्या विकसकाने अटींची व अन्य कागदपत्रांची पूर्तता केली आहे. त्यांनाच या कामासाठी संधी मिळते. आता अशा प्रकारे विविध झोपडपट्ट्यांचे पुनर्वसनाचे काम मिळावे, यासाठी काही राजकीय लोक, जमीन दलाल, बिल्डर्स यांच्यात मोठी चढाओढ सुरू आहे. झोपडीधारकाला संमतिपत्र देताना कोऱ्या अर्जावर सह्या घेण्याची सक्ती असते. त्याशिवाय संबंधित कुटुंबाला हा अर्ज कशासाठी भरून घेतला जातो. त्याची पूर्ण कल्पना दिली जात नाही. कोणीतरी झोपडीदादा अथवा भाई येतो आणि संमती पत्रावर सही करण्याची सक्ती करतो. झोपडीधारक पात्र की अपात्र याची खातरजमा न करता सर्रास सह्या घेतल्या जातात. हे सार्वत्रिक चित्र अनेक झोपडपट्ट्यांतून पाहायला मिळते. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

काही बरेवाईट होऊ नये म्हणून जिवाच्या भीतीने सही करतात. पोलिसांनी अशांचा तत्काळ बंदोबस्त करावा. 

ब्रिटनमधून येणाऱ्या प्रवाशांसाठी नवी नियमावली जाहीर; विमानसेवा सुरु


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Complaint of corporator to the Commissioner regarding SRA scheme