शरद पवार यांच्या पाठोपाठ रोहित पवारांनीही 'या' कार्यकर्त्याच्या कुटुंबीयांचे केले सांत्वन 

शरद पवार यांच्या पाठोपाठ रोहित पवारांनीही 'या' कार्यकर्त्याच्या कुटुंबीयांचे केले सांत्वन 

पिंपरी : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी दिवंगत नगरसेवक दत्ता साने यांच्या कुटुंबीयांची मंगळवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास भेट घेऊन सांत्वन केले. त्या पाठोपाठ राष्ट्रवादी कॉंग्रेसचेच युवा नेते व आमदार रोहित पवार यांनीही दुपारी चारच्या सुमारास साने कुटुंबीयांची भेट घेतली. 

पिंपरी-चिंचवड शहर म्हणजे पवार कुटुंबीयांचा एकेकाळचा बालेकिल्ला. मात्र, मतदारसंघांची फेररचना झाली. काही शिलेदार सोडून गेले आणि राष्ट्रवादीच्या हातून शहराची सत्ता गेली. परंतु, दत्ता साने यांनी आपल्या हिमतीवर चिखली परिसरात पक्षाचा झेंडा फडकवला आणि तब्बल तीन वेळा महापालिकेत नेतृत्व केले. 2017 च्या निवडणुकीनंतर पक्षाला विरोधात बसावे लागले. पण, विरोधी पक्षनेतेपदी कोण? असा प्रश्‍न निर्माण झाला. कारण, राष्ट्रवादीचे 36 नगरसेवक होते. त्यापैकी एक नाव पुढे आले ते म्हणजे दत्ता साने. पक्ष श्रेष्ठींनी विश्‍वास दाखवला आणि साने यांनी तो सार्थ केला. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आपल्या विरोधी पक्ष नेतेपदाच्या कार्यकाळातच नव्हे, तर त्यानंतर सुद्धा त्यांचा सभागृहातील आक्रमकपणा कमी झालेला नव्हता. त्यामुळे साने पवार कुटुंबीयांच्या निकटवर्ती ठरले. त्यांच्या दुर्दैवी जाण्याने पक्षाचे नुकसान झालेले असले तरी, त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करणे, त्यांना भावनिक आधार देणे आवश्‍यक होते. त्यामुळेच पक्षाचे अध्यक्ष खुद्द शरद पवार यांनी चिखलीत साने यांच्या निवासस्थानी येऊन त्यांच्या कुटुंबीयांची विचारपूस केली. त्यांचे सांत्वन केले. साने यांना काय त्रास होत होता?, प्रकृती कशी होती? याबाबत माहिती घेतली. त्यापाठोपाठ रोहिर पवार यांनी साने कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com