मुंबईहून पुण्याकडे कंटेनर जात असताना अचानक महिला समोर आली अन्....

मुंबईहून पुण्याकडे कंटेनर जात असताना अचानक महिला समोर आली अन्....

बेबडओहोळ (ता. मावळ) : सोमाटणे चौकात अपघात होता होता वाचला. मात्र, महिलेच्या पायाला दुखापत झाल्याची घटना सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. 

तळेगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईकडून पुण्याच्या दिशेने कंटेनर जात होता. त्यावेळी सोमाटणे चौकात रस्ता ओलांडणाऱ्या महिलेमुळे कंटेनर चालकाने ब्रेक दाबला. त्यामुळे कंटेनर काही अंतरापर्यंत घसरत गेला व दुभाजकावर चढला. सुदैवाने यात कुठलीही मोठी दुर्घटना घडली नाही. मात्र, महिलेच्या पायाला दुखापत झाली आहे. त्यांना उपचारार्थ सोमाटणेतील रुग्णालयात दाखल केल्याचे पोलिसांनी सांगितले. पुढील तपास पोलिस हवालदार दिलीप कदम करीत आहे. 

पवन मावळातील व जुन्या महामार्गावरील हा महत्त्वाचा व मोठा चौक आहे. त्यादृष्टीनेच येथील वाहतुकीचे नियोजन करणे गरजेचे असल्याने या ठिकाणी सिग्नल यंत्रणा बसवावी, अशी मागणी उपसरपंच सुधीर मुऱ्हे यांनी केली होती. तसेच, 'सोमाटणे चौक होतोय धोकादायक' या शीर्षकाखाली सोमवारी (ता. 10) 'सकाळ'मध्येही वृत्त प्रसिद्ध झाले होते.  

दरम्यान, तीन दिवसानंतर या ठिकाणी अपघात झाल्याने सिग्नल यंत्राणा किती गरजेची आहे, हे दिसून आले आहे. जुना मुंबई-पुणे महामार्ग व द्रुतगती मार्गाकडे जाणारी वाहने व बाहेर पडणाऱ्या वाहनचालकांना सोमाटणे चौकातूनच जावे लागते. त्यामुळे सोमाटणे चौकात वाहतुकीच्या व सुरक्षिततेच्या दृष्टीने सिग्नल यंत्रणा महत्त्वाची ठरणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com