सांगवी परिसरातील नागरिक म्हणतायेत 'पाणी रे पाणी तेरा रंग कैसा'... 

water.jpg
water.jpg

सांगवी जुनी : सांगवी परिसरात कोरोना महामारी संकटासोबतच पिण्याचे पाणी गढूळ दुषित पुरवठा होत असल्याने नागरीकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे.

जुनी सांगवी परिसरातील मुळानगर, जयमालानगर, पवनानगर, औंध जिल्हा रूग्णालय कामगार वसाहतीत अनेकजण अतिसार,उलट्या,पोटदुखीच्या त्रासाने त्रस्त झाले आहेत.पाणी उकळून गाळले तरीही पाण्याला कुबट दुर्गंधीयुक्त वास येत असल्याचे नागरीक सांगतात.

येथील मुळानगर परिसरात जुलाब उलट्या,पोटदुखीमुळे अनेकजण खाजगी दवाखान्यात उपचारासाठी रांगा लावत आहेत.कोरोना महामारीचे संकट त्यात लॉकडाऊनमुळे नागरीक दुहेरी संकटाचा सामना करत असताना दुषित पाण्यामुळे होणा-या आजारामुळे नागरीकांना या संकटालाही तोंड द्यावे लागत आहे.याबाबत पाणीपुरवठा अधिका-यांशी संपर्क साधला असता संपर्क होवू शकला नाही.तर एका पाणीपुरवठा कर्मचा-याने वरून जे पाणी येते तेच आम्ही देतोय.कुठे लिकेज तर नाही ना यासाठी आम्ही पाहणी करून काम करत आहोत असे सांगितले.
तर अशी ठिकाणे आढळल्यास लाईन वॉश आऊट करून घेण्यात येते.

येथील जिल्हा रूग्णालय कामगार वसाहतीत पाणीपुरवठा लाईन शेजारीच ड्रेनेज लाईन लिकेज असल्याचे येथील रहिवाशांनी सांगितले येथे याद्वारे पाणी मिसळत असल्याची भिती रहिवाशांनी सकाळशी बोलताना व्यक्त केली.यापूर्वीही अनेकदा येथील दुरूस्त्या करून घेण्याबाबत रहिवाशांनी स्थानिक प्रशासनाकडे मागणी केली होती.मात्र याची दखल घेतली गेली नसल्याचे नागरीक सांगतात.परिसरात काही ठिकाणी लिकेजमुळे पाण्याची डबकी तयार झाली आहेत.त्याभोवती गवत वाढले आहे.साचून राहिलेल्या पाण्यामुळे दुर्गंधी बरोबरच डास,किटक,भटकी जनावरे यांचाव त्रास कायम सहन करावा लागत आहे.मात्र वेळोवेळी मागणी करूनही याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे येथील रहिवाशी सांगतात.

कोरोना महामारीचे संकट त्यात लॉकडाऊन व यात बेजार झालेल्या माणसांवर पिण्याच्या पाण्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.यामुळे माझ्या कुटूंबातील लहान मुलांसह खाजगी डॉक्टरकडे उपचार घ्यावा लागला.-प्रशांत खंडाळे रहिवाशी कामगार वसाहत 

कुठे पाणी मिसळत असल्यास नागरीकांच्या तक्रारी घेवून योग्य त्या दुरूस्त्या करून घेणे लाईन वॉश आऊट करण्याबाबत संबंधित विभागाला सुचना करण्यात आल्या आहेत.-संतोष कांबळे नगरसेवक प्रभाग क्रं.३२
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com