पिंपरी-चिंचवडमध्ये रिमझिम सरी, सलग १२ तासांपासून पाऊस सुरू

पिंपरी-चिंचवडमध्ये रिमझिम सरी, सलग १२ तासांपासून पाऊस सुरू

पिंपरी : शहर परिसरात सोमवारी (ता. 3) दुपारपासून पावसाची रिमझिम सुरू आहे. दरम्यान हलका ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडत आहेत. मात्र, संततधार पाऊस सुरु असल्याने ठिकठिकाणी पाण्याची तळी साचली आहेत. पावसाने कालपासून जराही विश्रांती घेतली नसल्याने 12 तास उलटूनही रिमझिम धारा पडत आहेत.

शहर परिसरात जूनमध्ये पावसाने तुरळक हजेरी लावली. शहरात यंदा पाऊस कमी झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. अगोदरच शहरात दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. मात्र, पावसाची ही परिस्थिती राहिल्यास पाणीपुरवठा सुरळीत होईल, की नाही ही चिंता नागरिकांना सतावत आहे. गेल्या आठवड्यात केवळ एकदा पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यानंतर मध्येच ऊन व थंडी असा खेळ वातावरणात सुरू झाला. ढगाळ वातावरण तयार होऊन मध्येच गायब होत आहे. मात्र, अद्यापपर्यंत चांगला पाऊस झालेला नाही. कालच्या पावसालाही तितकासा जोर नव्हता. दिवसभरच्या रिपरिप पावसाने नागरिकांची मात्र, चांगलीच तारांबळ उडाली आहे. काही भागांमध्ये सकाळपासून पाऊस पडण्यास चांगली सुरुवात झाली आहे. शहराच्या बहुतेक भागांत कमी-अधिक प्रमाणात पावसाने हजेरी लावली. त्यामुळे ठिकठिकाणी रस्त्यांच्या सखल भागांत पाणी साचल्याने वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे.

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पिंपरी, कासारवाडी, सांगवी, पिंपळे गुरव, दापोडी या भागात रात्रीपासूनच पाऊस सुरु आहे. काही वेळा मधूनच जोराचे वारे सुटत आहे. शंकरवाडी भुयारी मार्गात पाणी साचल्याने त्या भागातील वाहतूक बंद झाली. शहरातील नाले देखील तुडुंब भरून वाहू लागले आहेत. काही जणांनी पावसाच्या पाण्याला वाट मिळत नसल्याने चेंबरची झाकणे खुली केली. मेट्रोच्या कामामुळे रस्त्याला खड्डे पडल्याने वाहनचालकांना पावसामुळे अंदाज येत नाही. त्यामुळे अपघात होण्याची शक्‍यता आहे. पावसामुळे पिंपरी व चिंचवड भाजीमंडईमध्ये व्यावसायिकांची चांगलीच तारांबळ उडाली. पिंपरी भाजी मंडईत पावसातही भाजी खरेदीसाठी सकाळी गर्दी वाढली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com