पिंपरी-चिंचवडकरांनो कोरोनाचा धोका वाढतोय; आज दुपारची 'ही' आकडेवारी बघाच...

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 मे 2020

पिंपरी-चिंचवड शहरात संसर्ग सुरू होऊन 70 दिवस उलटून गेले आहेत. या सत्तर दिवसांत अनेक घटना घडल्या आहेत.

पिंपरी Coronavirus : पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या गुरुवारी (ता. 21) दुपारी बारापर्यंत 252 झाली. शहराने अडीचशेचा आकडा ओलांडला असला, तरी बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्याही दीडशेपर्यंत पोचली आहे. आजपर्यंत बरे झालेल्यांची संख्या 142 आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

No photo description available.

पिंपरी-चिंचवड शहरात संसर्ग सुरू होऊन 70 दिवस उलटून गेले आहेत. या सत्तर दिवसांत अनेक घटना घडल्या आहेत. सुरुवातीला सोसायटीत आढळलेला कोरोना आता मध्यमवर्गीय वस्तीतून झोपडपट्टीत शिरला आहे. त्याला नियंत्रणात आणण्यासाठी महापालिकेचे वायसीएम व भोसरी रुग्णालय सज्ज आहे.‌ याशिवाय मोबाईल लॅबद्वारे वस्ती पातळीवर कोरोनापूर्व चाचणी मोफत केली जाणार आहे. त्याचा प्रारंभ बुधवारपासून (ता. 20) झाला. 

No photo description available.

सध्या वायसीएम व भोसरी रुग्णालयांत 103 जणांवर उपचार सुरू आहेत. आजपर्यंत सात जणांचा मृत्यू झाला आहे. आज नऊ रुग्ण दाखल झाले आहेत. हे रुग्ण पिंपळे सौदागर, दिघी, वाल्हेकरवाडी, पिंपरी परिसरातील आहेत. एकूण 252 रुग्णांमध्ये 147 पुरुष व 102 महिला आहेत. यातील 142 जण बरे होऊन घरी गेले आहेत. 22 ते 39 वयोगटातील अर्थात तरुणाईची संख्या 108 आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona patient crossed 250 at primpri chinchwad today