पुणे : मावळात आजही आढळला एक कोरोना रुग्ण

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 मे 2020

आंदर मावळातील नागाथली येथे सोमवारी (ता.१८) पहाटे मुंबईहून आलेला एक ४२ वर्षे वयाचा तरुण कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे.

वडगाव मावळ : आंदर मावळातील नागाथली येथे सोमवारी (ता.१८) पहाटे मुंबईहून आलेला एक ४२ वर्षे वयाचा तरुण कोरोना पॉझिटिव्ह आढळला असून त्याला उपचारासाठी औंध येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती तहसिलदार मधुसूदन बर्गे यांनी दिली.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

नागाथली गाव कंटेन्मेंट झोन म्हणून तर कुसवली, शिंदेवाडी व वहाणगाव ही तीन गावे बफर झोन म्हणून जाहीर करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.दरम्यान सलग दुसऱ्या दिवशी तालुक्याच्या ग्रामीण भागात कोरोना संसर्गाचा रुग्ण आढळल्याने तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

कोरोनाग्रस्त तरुण मुळचा नागाथली येथील असून सोमवारी (ता.१८) पहाटे तो मुंबईहून पास घेऊन आपल्या गावी आला होता. त्याला लागलीच होमक्वारंटाईन करण्यात आले होते. मंगळवारी ( ता. १९) ताप व कोरडा खोकल्याचा त्रास झाल्याने तपासणीसाठी तो टाकवे बुद्रुक येथील प्राथमिक केंद्रात गेला होता. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला औंध येथील जिल्हा रुग्णालयात तपासणी साठी पाठवले होते. तो कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल बुधवारी (ता.२०) प्राप्त झाला.

आता मोलकरणींना कामावर जाता येणार पण...

तहसीलदार बर्गे यांच्यासह गटविकास अधिकारी शरदचंद्र माळी, तालुका आरोग्याधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे यांनी लागलीच गावात जाऊन त्याच्या संपर्कात आलेले त्याचे वडील,पत्नी,दोन मुले, त्याला मुंबई येथून घेऊन आलेला चालक,त्याच्या घरातील दोन व्यक्ती तसेच टाकवे बुद्रुक येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात त्याच्या संपर्कात आलेल्या दोन व्यक्ती अशा नऊ जणांना तपासणी साठी वायसीएम रुग्णालयात पाठवले आहे.

 आदित्य ठाकरे यांची पुण्याच्या आमदाराबरोबर ट्विटरवर जुंपली

खबरदारीचा उपाय म्हणून नागाथली गाव कंटेन्मेंट झोन म्हणून तर जवळची कुसवली, शिंदेवाडी, व वहाणगाव ही गावे बफर झोन म्हणून जाहीर केली आहेत. दरम्यान तालुक्याच्या ग्रामीण भागात सलग दुसऱ्या दिवशी कोरोना संसर्गाचे रुग्ण आढळल्याने तालुक्यात भीतीचे वातावरण पसरले आहे.
गुन्हे दाखल करण्याचे आदेश परजिल्हा अथवा परप्रांतातून येणाऱ्या नागरिकांची पोलिसांनी नाक्यावर कडक तपासणी करावी. पास नसल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत असा आदेश तहसीलदार बर्गे यांनी दिला आहे.

परवानगी घेऊन आलेल्या नागरिकांची आरोग्य पथकाने नाक्यावरच आरोग्य तपासणी करावी . आजाराची लक्षणे असल्यास त्वरित जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवावे.लक्षणे नसलेल्या व्यक्तींना १४ दिवस होम क्वारंटाईन करावे. त्यावर ग्राम दक्षता समितीने लक्ष ठेवावे अशा सूचनाही बर्गे यांनी केल्या आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona patient is still found in Mawla today