आयटी पार्कची चिंता वाढली; हिंजवडी, माणमध्ये आणखी पॉझिटिव्ह आढळले

आयटी पार्कची चिंता वाढली; हिंजवडी, माणमध्ये आणखी पॉझिटिव्ह आढळले

हिंजवडी : आयटीची पंढरी म्हणून नावाजलेल्या हिंजवडी आणि माण गावात आता कोरोनाचा फैलाव जोमाने वाढल्याने परिसरातील नागरिकांची चिंता वाढली आहे. माणमधील एका ३७ वर्षीय व्यक्तीस कोरोनाची बाधा झाली असून, हिंजवडीतील मुकाईनगर परिसरातील 3 वर्षीय मुलीला व ब्लुरीज सोसायटीत राहणाऱ्या एका व्यक्तीलादेखील कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती मुळशीचे गटविकास अधिकारी संदीप जठार व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अजित करंजकर यांनी दिली. 

खबरदारी म्हणून माणमधील रुग्णाच्या संपर्कात आलेल्या त्याच्या कुटुंबातील बावीस जणांना होम क्वारंटाइन करण्यात आले आहे. येथील ठाकर वस्ती येथे वास्तव्य करत असलेल्या युवकास मंगळवारी (ता. 30) कोरोनाची लागण झाल्याचे समजताच खबरदारी म्हणून स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने तो राहात असलेला परिसर सील करून परिसरात निर्जंतुकीकरणासाठी सोडीयम हायपोक्लोराईड औषध फवारणी केल्याचे मुळशीचे सभापती पांडुरंग ओझरकर यांनी सांगितले. ते म्हणाले, की मुळशीत आता वेगाने संक्रमण होत असून, प्रशासन योग्य ती दक्षता घेत आहे. मात्र, आता नागरिकांनीच आवश्यक असेल, तरच घराबाहेर पडले पाहिजे अन्यथा तालुक्याची परस्थिती बिकट होईल.

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 
    
यापूर्वी माण हद्दीतील आयटीपार्क फेज तीनमध्ये एका उच्चभ्रू सोसायटीत मुंबई प्रवास करून आलेल्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाली होती. तर नेरे दत्तवाडी, जांबे येथील कोलते पाटील गृहप्रकल्प व मारुंजीमध्येही कोरोनाबाधित रुग्ण सापडल्याने परिसराची चिंता वाढली आहे. या वाढत्या संक्रमणामुळे नेरे मारुंजी ग्रामस्थांनी स्वतःहून गावात कर्फ्यू लावला होता. 
ग्रामस्थांनी घाबरून जाऊ नये, फिजिकल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर करावा तसेच वेळोवेळी देण्यात आलेल्या सुचनांचे काटेकोर पालन करावे. महत्त्वाचे काम असेल तरच घराबाहेर पडावे, असे आवाहन माण प्राथमिक आरोग्य केंद्रांचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बालाजी लकडे यांनी केले आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com