मावळवासीयांनो कोरोना वाढतोय; काळजी घ्या 

मावळवासीयांनो कोरोना वाढतोय; काळजी घ्या 

वडगाव मावळ (पुणे) : मावळ तालुक्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने पुन्हा घरोघरी सर्वेक्षणाची मोहीम राबवली जाणार आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन नागरिकांनी स्वतःची काळजी घेऊन सुरक्षेच्या त्रिसुत्रीचे पालन करावे. शासकीय नियमांचे पालन न करणाऱ्या संस्था व व्यक्तींवर कठोर कारवाई केली जाणार आहे, अशा इशारा तहसीलदार मधुसूदन बर्गे यांनी दिला. 

कोरोनाची सद्यःस्थिती 
- सक्रिय रुग्णांची संख्या वाढतेय 
- प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुन्हा घरोघरी सर्वेक्षणाची मोहीम 
- लक्षणे आढळून आलेल्या व्यक्तींनी तळेगावात मोफत कोरोना चाचणी 
- पॉझिटिव्ह आल्यास स्वतःहून विलगीकरण करून घ्यावे 
- विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांना सुरुवातीला ५०० रुपये दंड 
- विनामास्क आढळल्यास एक हजार रुपये दंड आकारणार 
- उल्लंघन केल्यास आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार कारवाईही केली जाणार 
- गर्दीची ठिकाणे असलेल्या हॉटेल, मंगल कार्यालये व इतर सार्वजनिक ठिकाणी उपस्थितांची मर्यादा पाळणे 
- नियम न पाळल्यास संबंधितांवर फौजदारी कारवाई करणार 
- गेल्या दोन दिवसांत ५,९८३ जणांना लसीकरण 
- कोणालाही लसीकरणामुळे त्रास झाला नाही 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

तालुक्यातील मोफत केंद्र 
- कान्हे येथील ग्रामीण रुग्णालय, येळसे, कार्ला, आढले बुद्रूक व तळेगाव दाभाडे येथील प्राथमिक आरोग्य केंद्र 

महात्मा फुले जनआरोग्य योजना 
- सोमाटणे येथील पवना व पायोनिअर हॉस्पिटल, तळेगाव दाभाडे येथील अथर्व व मायमर मेडिकल कॉलेज व लोणावळा येथील संजीवनी हॉस्पिटल 
- लसीकरण शुल्क २५० रुपये 

नोंदणीबाबत... 
- लसीकरणात ६० वर्षांवरील नागरिक व ४५ ते५९ वयोगटातील गंभीर आजार असलेल्या व्यक्तींना लसीकरण 
नागरिकांनी आरोग्य सेतू व कोव्हीड अँपवर नोंदणी करावी 
- लसीकरणासाठी एसएमएस पाठविला जाईल 
- ठरवून दिलेल्या वयोगटातील नागरिकांनीच लसीकरण केंद्रावर जावे इतरांनी तेथे गर्दी करू नये 

आवश्‍यक कागदपत्रे 
- शासकीय कर्मचारी असल्यास शासकीय ओळखपत्र 
- आधार कार्ड, पॅनकार्ड, वाहन परवाना, पेन्शन प्रमाणपत्र यापैकी एक 
- ४५ ते ५९ वयोगटातील व्यक्तींनी कोणताही आजार असल्यास त्याबाबतचे डॉक्‍टरांचे प्रमाणपत्र सोबत आणावे 

‘‘कोविडच्या साथीची वाढ थांबविण्यासाठी प्रशासनाने दिलेल्या नियमांचे पालन करावे. साथीचा प्रसार होणार नाही, याची दक्षता घ्यावी.’’ 
- मधुसूदन बर्गे, तहसीलदार मावळ 
 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com