#BreakingNews : आयटी पार्कमध्येही कोरोनाचा शिरकाव

#BreakingNews : आयटी पार्कमध्येही कोरोनाचा शिरकाव

हिंजवडी : येथे आपल्या नातेवाइकांकडे आलेल्या पुण्यातील एका नागरिकाला कोरोनाचा संसर्ग झाला असून, त्याचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे माणच्या प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बालाजी लकडे यांनी सांगितले. 

हिंजवडीत राहत असलेल्या नातेवाइकाकडे 11 मे रोजी हा रुग्ण मुक्कामी आला होता.  14 मे रोजी त्यात कोरोनाची लक्षणे दिसू लागली. त्यामुळे त्याला तपासणीसाठी पाठवले असता त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. या घटनेमुळे गेले दोन महिने कोरोनाबाबत सतर्क राहिलेले प्रशासन व नागरिक हादरून गेले आहेत.

प्रशासनाने घेतलेल्या दक्षतेमुळे हिंजवडीत अद्याप कोरोनाचा शिरकाव झाला नव्हता. मात्र, लॉकडाउन काही प्रमाणात शिथिल केल्याने पुणे, मुबंई सारख्या शहरातून येणाऱ्यांची संख्या वाढल्याने आता आयटी नगरीतही कोरोनाने शिरकाव केला आहे. हिंजवडी ग्रामपंचायत हद्दीतील सहा वॉर्डांमध्ये आरोग्य पथके तैनात केली असून, आरोग्य सेवक व शिक्षकामार्फत पूर्ण गावाचा सर्व्हे केला आहे. तसेच, पुणे व मुबंईवरून आलेल्या 79 जणांना होम क्वारंटाइन केले असून, त्यांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी प्रशासन घेत असल्याचे मुळशीचे गटविकास अधिकारी संदीप जठार यांनी सांगितले. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

नागरिकांनी प्रशासनाला कळवावे

पुणे, मुबंई या रेड झोन असलेल्या भागात लॉकडाउनमुळे काही नागरिक अडकून पडले असले, तरी ते आता कुटुंबाकडे किंवा नातेवाइकांकडे येत आहेत. ही गोष्ट कुणीच रोखू शकत नाही. मात्र, आपल्याकडे नव्याने आलेल्या पाहुण्यांबाबत नागरिकांनी प्रशासनाला कळविले पाहिजे. जेणेकरून सतर्कता बाळगून फैलाव रोखता येईल, असे आवाहन डॉ. बालाजी लकडे यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com