हिंजवडी आयटी पार्कमध्ये कोरोनाचा धोका वाढतोय, आज या परिसरात रुग्ण आढळले

हिंजवडी आयटी पार्कमध्ये कोरोनाचा धोका वाढतोय, आज या परिसरात रुग्ण आढळले

हिंजवडी : आयटी परिसर असलेल्या मारुंजी पाठोपाठ आता नेरे दत्तवाडीमध्ये एक, तर हिंजवडीमध्ये कोरोनाचे दोन रुग्ण आढळल्याने आयटी परिसरात चिंता व्यक्त होत आहे. दत्तवाडीतील व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या त्याच्या कुटुंबातील पाच व अन्य पाच जणांना क्वारंटाइन केले असून, हा भाग मायक्रो कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर केल्याचे मुळशीचे गटविकास अधिकारी संदीप जठार यांनी सांगितले.

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

नेरे दत्तवाडीतील पॉझिटिव्ह रुग्ण हा पुणे महापालिकेमध्ये आरोग्य विभागात सफाई कामगार असून, तो बोपोडी, बालेवाडी परिसरात काम करतो. ड्युटीवर असतानाच त्याला कोरोनाचा संसर्ग झाला असावा, असा अंदाज माण प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बालाजी लकडे यांनी व्यक्त केला. ते म्हणाले, की नेरे दत्तवाडी पाठोपाठ आता हिंजवडीमध्ये वास्तव्यास असलेल्या एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती रात्री उशिरा प्राप्त झाली आहे. मात्र, तो अहवाल अद्याप प्राप्त झाला नाही. तर हिंजवडीतील एका कंपनीत काम करणारा एक जण येरवडा परिसरात राहायला आहे. त्याचाही अहवाल पॉझिटिव्ह आल्याने आता हिंजवडी आयटी परिसराला कोरोनाचा विळखा पडू लागला आहे. त्यामुळे हा फैलाव रोखण्यासाठी नागरिकांनी आता अधिक दक्ष राहिले पाहिजे. 

दरम्यान, हिंजवडी पोलिसांनी दत्तवाडी परिसर सील केला असून, नेरे व मारुंजी ग्रामस्थांनी स्वतःहून गावात लॉकडाउन पाळला आहे. मास्कविना फिरणाऱ्यांवर नेरे ग्रामपंचायतीने दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. परिसरातील बांधकामे व दुकाने बंद ठेवून कडकडीत बंद पाळल्याचे नेरेच्या सरपंच विद्या जाधव यांनी सांगितले. त्या म्हणाल्या, की मारुंजीमध्ये रुग्ण मिळाल्यानंतर आम्ही सतर्कतेच्या उपाययोजना म्हणून गावात स्वयंस्फूर्तीने लॉकडाउन सुरू केला आहे. पुढील चार दिवस हा कर्फ्यू सुरू ठेवणार असून, लोकांमध्ये कोरोनाच्या दक्षतेविषयी जनजागृती करत आहोत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com