Corona Updates : पिंपरी-चिंचवडमध्ये आज १०० नवे रुग्ण

Corona Updates : पिंपरी-चिंचवडमध्ये आज १०० नवे रुग्ण

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात सोमवारी १०० रुग्ण आढळले. एकूण रुग्णसंख्या एक लाख एक हजार ८६८ झाली आहे. आज ६२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या ९८ हजार २७ झाली आहे. सध्या दोन हजार १४ सक्रिय रुग्ण आहेत. आज शहरातील कोणाचाही मृत्यू झाला नाही. शहराबाहेरील एका रुग्णाचा मृत्यू झाला. आजपर्यंत शहरातील एक हजार ८२७ आणि बाहेरील ७७१ जणांचा मृत्यू झाला आहे. आज ६०० जणांना लस देण्यात आली. आजपर्यंत १३ हजार ५४२ जणांना लस दिली आहे. सध्या रुग्णालयांत ७०७ रुग्ण उपचार घेत आहेत. एक हजार ३०७ रुग्ण होम आयसोलेट आहेत.

कंटेन्मेंट झोनमधील २५१ घरांना आज स्वयंसेवकांनी भेट दिली. त्यातील ८७२ जणांची तपासणी केली. ८८९ जणांचे आज विलगीकरण करण्यात आले. आजपर्यंत एक लाख २५ हजार २११ जणांचे विलगीकरण करण्यात आले.

आज एक हजार ९५१ संशयित रुग्णालयात दाखल झाले. दोन हजार ३८४ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. ५९६ जणांचे रिपोर्ट प्रतीक्षेत आहेत. एक हजार ९१२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

आजपर्यंत सहा लाख ३८ हजार ६१६ संशयित रुग्णालयात दाखल झाले. पाच लाख ३६ हजार १५२ जणांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. सहा लाख ३४ हजार २८१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.आज मृत्यू झालेली शहराबाहेरील व्यक्ती खडकी (वय ५६) येथील रहिवासी आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com