Corona Updates : पिंपरी-चिंचवड शहरात आज 164 नवीन रुग्ण 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 20 November 2020

  • पिंपरी-चिंचवड शहरात आज 164 रुग्ण आढळले.

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात आज 164 रुग्ण आढळले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 90 हजार 289 झाली आहे. आज 142 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 86 हजार 998 झाली आहे. सध्या एक हजार 709 सक्रिय रुग्ण आहेत. आज शहरातील पाच आणि बाहेरील तीन, अशा आठ जणांचा मृत्यू झाला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शहरातील मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या एक हजार 582 आणि शहराबाहेरील मृतांची संख्या 655 झाली आहे. आज मृत्यू झालेले शहरातील पुरुष पिंपरी (वय 67), कासारवाडी (वय 57), वाकड (वय 45) व काळेवाडी (वय 50), महिला भोसरी (वय 75) येथील रहिवासी आहेत. आज मृत्यू झालेले शहराबाहेरील पुरुष आंबेगाव (वय 60), राजगुरुनगर (वय 70) व महिला खेड (वय 75) येथील रहिवासी आहेत. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सध्या महापालिका रुग्णालयांत केवळ 631 रुग्ण उपचार घेत आहेत. एक हजार 78 रुग्ण होम आयसोलेट आहेत. रुग्णालयात दाखल शहराबाहेरील रुग्णांची संख्या 111 आहे. आजपर्यंत शहराबाहेरील सहा हजार 971 रुग्ण बरे झाले आहेत. 

कंटेन्मेंट झोनमधील एक हजार 361 घरांना आज स्वयंसेवकांनी भेट देऊन पाहणी केली. त्यात चार हजार 678 जणांची तपासणी करण्यात आली. आज 321 जणांचे विलगीकरण करण्यात आले. आजपर्यंत 66 हजार 352 जणांचे विलगीकरण करण्यात आले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona updates pimpri chinchwad new 164 cases found