
सिरमकडून येणाऱ्या लस सेंट्रल स्टोअरला कोल्ड रूममध्ये साठवून ठेवण्यात आल्या. हेल्थ वर्कर्ससाठी शंभर-शंभरच्या टप्प्याने बैठक व्यवस्था केलेली आहे.
पिंपरी - महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयामधील चाणक्य हॉलमध्ये बुधवारी कोरोना प्रतिबंधक लसीची ट्रायल रन झाली. सिरमकडून येणाऱ्या लस सेंट्रल स्टोअरला कोल्ड रूममध्ये साठवून ठेवण्यात आल्या. हेल्थ वर्कर्ससाठी शंभर-शंभरच्या टप्प्याने बैठक व्यवस्था केलेली आहे. लस देणाऱ्या व्यक्तीला मोबाईलवर संदेशाच्या माध्यमातून वेळ कळविली जाणार असून, त्यांनीच उपस्थिती दर्शविणे गरजेचे आहे, अशी माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.
सीरमनंतर स्वदेशी भारत बायोटेकच्या लशीलाही मंजुरी मिळण्याची शक्यता; बैठक सुरु
सर्वांत प्रथम लसधारकांची नोंदणी केली जाणार आहे. इंजेक्शन रूम व निरीक्षण रूम केली आहे. सर्वांचे आधारकार्ड व वैयक्तिक माहिती प्रथम तपासली जाईल. प्रतीक्षा कक्ष केले असून, लस दिल्यानंतर तीस मिनिटे प्रत्येकाला येथे देखरेखीखाली ठेवले जाणार आहे. वायसीएममधील 1100, डी. वाय. पाटील रुग्णालयामधील दोन हजार व इतर खासगी दवाखाने अशा 16 ठिकाणांहून बारा हजार जणांना लस देण्याचे नियोजन केले आहे. रविवार वगळता इतर दिवशी लस देण्याचे काम सुरू राहणार आहे. 16 जानेवारीपासून लस देण्यास प्रारंभ होईल. यासाठी आशासेविका व नर्सची नियुक्ती करण्यात आली आहे.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
लस दिलेल्या व्यक्तीची माहिती "कोविन' ऍपवर अपलोड होणार आहे. त्रास झाला किंवा काही अत्यवस्थ वाटल्यास ऑक्सिजनची सुविधा करण्यात आली असून, त्वरित आयसीयू देखील उपलब्ध केले जाणार आहे. मोकळ्या वेळेत रुग्णांना राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम स्क्रीनवर दाखवले जाणार असल्याची माहिती अधिष्ठाता राजेंद्र वाबळे यांनी दिली.
ब्रिटनमधून येणाऱ्या प्रवाशांसाठी नवी नियमावली जाहीर; विमानसेवा सुरु