पिंपरी-चिंचवड : पवना थडी यात्रेचा खर्च अंदाजापेक्षा जास्त; खर्चाच्या हिशेबात उशीर 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 12 October 2020

  • पवना थडीचा खर्च 97 लाख 36 हजार 
  • अंदाजापेक्षा 52 लाख अधिक खर्च 

पिंपरी : महापालिकेतर्फे मार्च महिन्यात सांगवीमध्ये आयोजित पवना थडी यात्रेचा अंदाजित खर्च 40 लाख 50 हजार रुपये होता. प्रत्यक्षात 97 लाख 36 हजार 746 रुपये खर्च झाला आहे. मात्र, कोरोना व लॉकडाउनमध्ये कमी मनुष्यबळ आणि वाढलेले काम यामुळे खर्चाबाबतचा हिशेब संबंधित विभागांकडून उशिरा प्राप्त झाला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

नागरवस्ती विकास योजना विभागातर्फे महिला व बालकल्याण योजनेअंतर्गत चार ते आठ मार्च कालावधीत सांगवीतील पीडब्ल्यूडी मैदानावर पवना थडी यात्रा आयोजित केली होती. त्यात एक हजार 225 स्टॉल होते. करमणूक व प्रबोधनात्मक कार्यक्रम झाले. पहिल्या दोन दिवसांतच 36 लाखांची उलाढाल झाली होती. मंडप व्यवस्था, स्टॉल उभारणी, विद्युत व्यवस्था, सांस्कृतिक कार्यक्रम आणि सुरक्षा व अग्निशामक विभागांकडून खर्च करण्यात आला. त्यातील 40 लाख 94 हजार 999 रुपये खर्चाची रक्कम संबंधित ठेकेदारांना देण्यात आली असून, आणखी 52 लाख 49 हजार 746 रुपये देणे बाकी आहेत. याबाबत विषय बुधवारच्या (ता. 14) स्थायी समिती सभेसमोर मान्यतेसाठी ठेवण्यात आला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: cost of Pavana Thadi Yatra is higher than estimated