esakal | सांगवीत भूमापन विभागाकडून जागा मोजणी सुरू; स्थानिकांचा विरोध
sakal

बोलून बातमी शोधा

सांगवीत भूमापन विभागाकडून जागा मोजणी सुरू; स्थानिकांचा विरोध

पिंपरी-चिंचवड पालिका व नगर भूमापन कार्यालय यांच्यामार्फत मुळा नदी किनारा परिसरात  मंगळवारी संयुक्त जागा मोजणीस सुरूवात करण्यात आली. मात्र ही मोजणी सुरू असतानाच ही मोजणी नियमबाह्य पद्धतीने होत असल्याचा आक्षेप घेत स्थानिकांनी या मोजणीस विरोध केला.

सांगवीत भूमापन विभागाकडून जागा मोजणी सुरू; स्थानिकांचा विरोध

sakal_logo
By
रमेश मोरे

जुनी सांगवी : पिंपरी-चिंचवड पालिका व नगर भूमापन कार्यालय यांच्यामार्फत मुळा नदी किनारा परिसरात  मंगळवारी संयुक्त जागा मोजणीस सुरूवात करण्यात आली. मात्र ही मोजणी सुरू असतानाच ही मोजणी नियमबाह्य पद्धतीने होत असल्याचा आक्षेप घेत स्थानिकांनी या मोजणीस विरोध केला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आमचा विकास कामाला पुर्वीपासून कधीही विरोध नव्हता. मात्र कोरोना काळात जमावबंदी असताना प्रशासनाला धारेवर धरत सत्ताधारी मंडळी मोजणी करत आहे. या परिसरातील अनेक घरे या मोजणीत बाधित आहेत. त्या संबंधी हरकती व सुचना येण्याआधीच मोजणीचा अट्टाहास कशासाठी? नियमांचे उल्लंघन करत हे काम अत्यावश्यक नसतानाही कोरोना काळात शासनाने घालून दिलेल्या अटी व नियमांचे उल्लघंन होत नाही का? स्थानिक बाधित जागा मालकांचा विरोध असतानाही संयुक्त मोजणीच्या नावाखाली नागरीकांची दिशाभूल केली जात आहे. ही मोजणी तूर्तास थांबवावी असा आक्षेप येथील नागरीकांनी घेतल्याने मंगळवार भूमापन अधिका-यांनी येथून काढता पाय घेतला.

मात्र पुन्हा बुधवार भूमापन विभागाकडून मोजणीस सुरूवात करण्यात आली. यावेळी ह क्षेत्रीय समिती अध्यक्ष हर्षल ढोरे, स्थायी सदस्य संतोष कांबळे, जवाहर ढोरे, नगररचना भुमापक अधिकारी सुहास शिंदे व पालिकेचे कर्मचारी उपस्थित होते. यावेळी रस्ता बाधित नागरीकांनी गर्दी केली होती. 

सदर मोजणी जमाव बंदी असताना कोरोनाच्या काळात अत्यावश्यक काम नसतानाही प्रशासन राजकीय दबावापोटी चुकीच्या पद्धतीने मोजणी करत आहे. हे काही काळानंतर योग्य पद्धतीने करावे असे आमचे म्हणणे आहे. मधूबन सोसायटी या ठिकाणी घरे बाधीत असणाऱ्या व कोर्टाचे आदेश दिलेल्या नागरिकांच्या जागा मोजू नका.अशी आमची मागणी आहे.त्यावरील हरकती व सुचना येण्याआधीच मोजणी करणे योग्य नाही.-प्रशांत शितोळे, कार्याध्यक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस

हे विकासकाम आहे .सांगवीतील नागरीकांची दखल घेवूनच मोजणीचे काम सुरू आहे. जागा मालक व बाधितांना याचा योग्य तो मोबदला नुकसान भरपाई दिली जाणार आहे. -उषा ढोरे, महापौर

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

संयुक्त मोजणीच्या नावाखाली भोगवाटदाराला मोजणीची माहितीच नाही.-बाबासाहेब ढमाले, नागरीक

संयुक्त मोजणीच्या नावाखाली नागरीकांची दिशाभूल विकासास विरोध नाही पण बेघर होणा-या नागरीकांना प्रथम न्याय द्यावा.-सुनिल ढोरे नागरीक 

९५ च्या डी.पी.प्लँननुसार ही १८ मीटर रस्त्याची मोजणी सुरू आहे.हि मोजणी प्राथमिक असून यात रस्ता व बाधित क्षेत्र मोजून याचे विविरण करण्यात येईल.हरकती व आक्षेपावर पालिका स्तरावर निर्णय घेण्यात येईल.-श्रीधन नायकवडी, परिक्षण भूमापक अधिकारी

काय घडले...

-नगर भूमापन व मनपा नगररचना विभागाच्या अधिकारी कर्मचारी यांनी सर्वे क्रमांक १३ते २६ या भागात मोजणीस सुरूवात केली होती.

-अधिका-यांकडून स्थानिकांच्या विरोध व आक्षेपानंतर मोजणी मधूबन येथील मोजणी वेळोवेळी थांबली.

-मंगळवार (ता. २७) मोजणी दरम्यान भाजपा व राष्ट्रवादी पुढा-यांमध्ये शाब्दीक चकमक.

-मोजणीस पोलिस बंदोबस्त फौजफाटा मात्र जमावबंदी व कोरोनाकाळातच मोजणीचा अट्टाहास का तो ही चुकीच्या पद्धतीने होत असल्याचा स्थानिकांचा आक्षेप.