esakal | पुनावळेत जुन्या भांडणाच्या रागातून दाम्पत्याला बेदम मारहाण 
sakal

बोलून बातमी शोधा

पुनावळेत जुन्या भांडणाच्या रागातून दाम्पत्याला बेदम मारहाण 
  • जुन्या भांडणावरून दाम्पत्याला लोखंडी रॉडने बेदम मारहाण केल्याची घटना पुनावळे येथे घडली.

पुनावळेत जुन्या भांडणाच्या रागातून दाम्पत्याला बेदम मारहाण 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पिंपरी : जुन्या भांडणावरून दाम्पत्याला लोखंडी रॉडने बेदम मारहाण केल्याची घटना पुनावळे येथे घडली. याप्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

ऋषीकेश कदम, देवा जमादार (दोघेही रा. डांगेचौक) व असिफ शेख (रा. भुजबळ वस्ती, पुनावळे) अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी रेश्‍मा जुबेर आत्तार (रा. जांबे नेरे फाटा, मुळशी) यांनी फिर्याद दिली. फिर्यादी व त्यांचे पती भाजी घेण्यासाठी रिक्षातून जात होते. त्यावेळी दुसऱ्या मोटारीतून जात असलेल्या आरोपींनी फिर्यादीच्या पतीला आवाज देऊन थांबविले. सकाळी झालेल्या भांडणाच्या कारणावरून आरोपींनी फिर्यादीसह त्यांच्या पतीला शिवीगाळ करीत हाताने मारहाण केली. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

तसेच, फिर्यादीच्या डोक्‍यात लोखंडी रॉडने व लाकडी दांडक्‍याने मारहाण करीत फिर्यादी यांनाही लाकडी दांडक्‍याने मारहाण केली. यामध्ये दोघेही गंभीर जखमी झाले. याप्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.