लैंगिक अत्याचारप्रकरणी काँग्रेस प्रवक्त्याच्या भावावर गुन्हा

Crime
Crime

लोणावळा - नोकरी लावण्याच्या आमिषाने २८ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी सुनीत वाघमारे याला अटक केली आहे. सुनीत हा माजी स्वीकृत नगरसेवक राहिला असून, काँग्रेसचे प्रवक्ते राजू वाघमारे यांचा बंधू आहे. तरुणीने सुनीत वाघमारे याच्याविरोधात बलात्कार आणि फसवणुकीची तक्रार दाखल केली होती. त्यानुसार मुंबईच्या भोईवाडा पोलिस ठाण्यामध्ये वाघमारे याच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून, तपासासाठी तो लोणावळा पोलिसांकडे वर्ग केला आहे. ‘रेल्वेत व शैक्षणिक संस्था स्थापन करणार असून, तेथे तुला नोकरी लावून देतो’, असे आमिष वाघमारे याने पीडित तरुणीस दाखविले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सुनीत हा विवाहित आहे; पण त्याने आपल्या पत्नीशी पटत नसल्यामुळे घटस्फोट घेणार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर पीडित तरुणीला लग्न करण्याचे वचन दिले होते. तसेच, पीडित तरुणीला घटस्फोट देण्यासाठी वकिलासोबत बैठक आहे, असे कारण देऊन लोणावळा येथे घेऊन गेला आणि तिच्यावर बलात्कार केला, असे पीडितेचे म्हणणे आहे. तरुणीने नकार दिल्यावर जीवे मारण्याची धमकी देऊन स्वत: आत्महत्या करीन, अशी धमकी देऊन सुनीतने बळजबरीने तिच्यावर अत्याचार केला, असेही तरुणीने तक्रारीत म्हटले आहे.

सुनीतने तरुणीसोबत लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहण्याचे सांगून मुंबईत एक फ्लॅटसुद्धा भाड्याने घेऊन दिला होता. त्यानंतर वारंवार तिच्यावर अत्याचार केला. काही दिवसांनी पीडितेने लग्नाचा तगादा लावल्यामुळे त्याने पीडितेला मारहाण केली. त्यानंतर पीडित तरुणीने पोलिस ठाण्यात जाऊन सुनीत विरोधात तक्रार दाखल केल्याचे पीडितेचे म्हणणे आहे. वाघमारेवर बलात्कार, फसवणूक आणि धमकाविण्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला असून, त्यास अटक केली आहे. त्यास शुक्रवारपर्यंत (ता. ५) पोलिस कोठडी सुनावली आहे.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com