चिखलीत खंडणीसाठी तरुणाचे अपहरण; तिघांना अटक

खंडणीसाठी तरुणाचे अपहरण करणाऱ्या तिघांना चिखली पोलिसांनी अटक केली. तसेच अपहृताची सुखरूप सुटका
crime news Kidnapping of youth for ransom Three arrested chikhli pimpri
crime news Kidnapping of youth for ransom Three arrested chikhli pimprisakal

पिंपरी : खंडणीसाठी तरुणाचे अपहरण करणाऱ्या तिघांना चिखली पोलिसांनी अटक केली. तसेच अपहृताची सुखरूप सुटका केली. हा प्रकार चिखली येथे घडला. गौतम नवनाथ सोनवणे (वय २६, रा. संभाजीनगर, चिंचवड), मयूर रेवण रामपुरे (वय २७, रा. नेवाळे वस्ती, चिखली), अब्दुल मुस्लिम चौधरी (वय २८, रा. हरगुडे वस्ती, चिखली) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तर प्रथम शंकरलाल गेहलोत (वय २५, रा. नक्षत्र सोसायटी, फेज १, चिखली) असे अपहरण झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांचे वडील शंकरलाल डुंगाजी गेहलोत यांनी फिर्याद दिलेली आहे. फिर्यादी यांचा मुलगा प्रथम व साडूचा मुलगा हे गुरुवारी (ता. १६) सायंकाळी चारच्या सुमारास चिखलीतील पूर्णानगर येथील नक्षत्र सोसायटीच्या मागील रस्त्याने पायी दुकानावर जात होते.

दरम्यान, मोटारीतून आरोपी तेथे आले. प्रथम याने गौतम याच्याकडून व्याजाने घेतलेले पन्नास हजार रुपये परत न केल्याने त्यास गौतम व त्याचे साथीदार जबरदस्तीने मोटारीतून घेवून गेले. त्यानंतर फिर्यादीला फोन करून 'जर तुम्ही एका तासात एक लाख ४० हजार घेवून अजंठानगर येथे आला नाही तर तुमच्या मुलाचे तुकडे करीन, अशी धमकी दिली. याबाबत फिर्यादीने चिखली पोलिस तक्रार देताच पोलिसांनी तातडीने पावले उचलली. काही तासातच मोबाईल लोकेशन व तांत्रिक तपासावरून अपहृताची सुटका करून आरोपींना अटक केली. पोलिस उपनिरीक्षक विवेक कुमटकर अधिक तपास करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com