दारू पिऊन पोलिसाची पत्नीला बेदम मारहाण

मैत्रिणीकडून शिवीगाळ व धमकी; दोघांवर गुन्हा दाखल
crime update after drinking alcohol Police beaten his wife
crime update after drinking alcohol Police beaten his wifeesakal

पिंपरी-चिंचवड : मैत्रिणीसह दारू पिऊन घरी आलेल्या पोलिसाने त्याच्या पत्नीला बेदम मारहाण केली. हा प्रकार मोशी येथे घडला. पोलिसासह त्याच्या मैत्रिणीवर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी ३२ वर्षीय पीडित महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार नितीन कैलास औटी व त्याची मैत्रीण (दोघेही रा. लक्ष्मीनगर, मोशी) यांच्यावर गुन्हा दाखल आहे. नितीन हा एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात नाईक पदावर कार्यरत आहे.

तर त्याची मैत्रीण पोलिस आयुक्तालयात लिपिक आहे. फिर्यादी या घरी असताना नितीन दारू पिऊन पहाटे साडे तीनच्या सुमारास त्यांच्या मैत्रिणीसह घरी आला. दरम्यान, त्याच्या भीतीने फिर्यादी लपून बसल्या. फिर्यादी नजरेस पडत नसल्याने तो दरवाजा, खिडक्या व कपाटावर लाथा मारून मैत्रिणीसोबत घरातून निघून गेला. त्यानंतर काही वेळाने तो पुन्हा मैत्रिणीसह घरी आला. फिर्यादीला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. तर नितीनच्या मैत्रीणीने फिर्यादीला शिवीगाळ करीत बघून घेण्याची धमकी दिली. याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com