पत्नीला नशेचे इंजेक्शन देऊन कागदपत्रे तयार केल्याप्रकरणी पतीवर गुन्हा दाखल

कागदपत्रे तयार करून फसवणूक केल्याप्रकरणी पतीवर गुन्हा दाखल
crime update Cheating his wife by injecting her drugs and signing papers pimpri
crime update Cheating his wife by injecting her drugs and signing papers pimpri sakal media

पिंपरी : पत्नीला नशेचे इंजेक्शन देऊन कागदपत्रे तयार करून घेतली. खात्यातून परस्पर पैसे काढले. तसेच मॉर्गेज पेपरसह इतर कागद पत्रावर बनावट सह्या करून फसवणूक केल्याप्रकरणी पतीवर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी पीडित महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार नीलेश सतीश कानडे (रा. आमची कॉलनी, बावधन) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. आरोपीने फिर्यादीला शारीरिक व मानसिक त्रास दिला. त्याच्याकडे असलेले स्त्रीधन फिर्यादीने मागितले असता ते न देता उडवाउडवीची उत्तरे देत त्याचा अपहार केला. मध्ये २०१५ फिर्यादीला नशेचे इंजेक्शन देऊन फिर्यादीकडून पॉवर ऑफ पॅटर्णी करून घेतले.

त्याचा वापर करून फिर्यादीचे सिमकार्ड, ईमेल, ऍक्सेस, बँकेचे अकाउंट्स, इन्शुरन्स पॉलिसीज , एफडी आरोपीने ताब्यात घेतले. त्याच्या माध्यमातून फिर्यादीच्या वैयक्तिक बचतीचे व पॉलिसीचे पैसे परस्पर काढून अपहार करीत फसवणूक केली. तसेच फिर्यादीच्या नावे अमेरिकेत ऑनलाईन पद्धतीने कंपन्या सुरु करून त्यामध्ये गैरव्यवहार करून शासनाचा टॅक्स चुकवला. यामध्ये शासनाची व फिर्यादीची फसवणूक केली. फिर्यादी व आरोपीच्या नावावर असणारा बंगला व त्याचे नावाचे ऑफिस मॉर्गेज करून फिर्यादीची संमती नसतानाही मॉर्गेज पेपर व इतर कागदपत्रांवर फिर्यादीच्या बनावट सह्या करून कर्ज घेतले. हा प्रकार १०९७ पासून अद्यापपर्यंत घडला. याप्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com