भोसरीत तरुणाचा गळा चिरून खून

वाढदिवसाच्या पार्टीतील किरकोळ वादाचे कारण
crime update Murder by slitting the throat of  young man Bhosari
crime update Murder by slitting the throat of young man Bhosarisakal

पिंपरी : मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीत किरकोळ कारणावरून झालेल्या वादात तरुणाचा काचेच्या बाटलीने गळा चिरून खून करण्यात आला. ही घटना भोसरी येथे घडली.तोफिक सय्यद (वय २७, रा. भोसरी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे . तोफिकच्या मित्राचा वाढदिवस असल्याने बर्थडे बॉयने रविवारी (ता.३) दुपारी त्याला हॉटेलमध्ये जेवणासाठी बोलावले होते. तसेच बड्डे बॉयचे इतरही मित्र तेथे आले होते .

दरम्यान तौफीक व बर्थडे बॉयच्या मित्राचा किरकोळ कारणावरून वाद झाला. यामध्ये आरोपीने तौफिकच्या गळ्यावर काचेच्या बाटली ने वार केला तसेच आणखी एकाला जखमी केले घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आरोपी पसार झाले असून त्यांचा शोध सुरू आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com