पिंपरी शहरात कोयता ‘पॅटर्न’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime update pimpri murder case attack theft scythe pattern in city

पिंपरी शहरात कोयता ‘पॅटर्न’

पिंपरी : शहरात एकीकडे कोयत्याने खून, प्राणघातक हल्ला, लूटमार अशा घटना घडत असताना दुसरीकडे कोयता बाळगणाऱ्यांचे प्रमाणही वाढत आहे. शनिवारी एकाच दिवशी कोयता बाळगल्याप्रकरणी वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांत तब्बल सात गुन्हे दाखल झाले. यावरून हे गुन्हेगार पोलिसांनाच आव्हान देत असल्याचे दिसून शहरात कोयता पॅटर्न रुजतोय का? अशी भीती व्यक्त केली जात आहे.

दिवसभरात आयुक्तालयाच्या हद्दीतील विविध ठाण्यात दाखल होणाऱ्या सरासरी दहा गुन्ह्यांपैकी किमान चार गुन्ह्यात कोयत्याचा वापर केल्याचे समोर येते. टोळक्याकडून सर्वाधिक या हत्याराचा वापर होतो. दहशत माजविण्यासह तोडफोड करण्यासाठी टोळके कोयते मिरवत असतात. यातून गंभीर घटना घडतात.

पोलिसांचा हवी जरब

बेकायदा कोयता बाळगण्याचे धाडस होऊ नये, यासाठी पोलिसांची अशा गुन्हेगारांवर जरब असायला हवी. कोम्बिंग ऑपरेशन केल्यानंतर कोयता बाळगणारे सापडतात. मात्र, इतर वेळीही अशा गुन्हेगारांची चाचपणी व्हायला हवी.

या कलमांतगर्त होते कारवाई

बेकायदा शस्त्र बाळगल्यास भारतीय हत्यार कायदा कलम ४ (२५) व महाराष्ट्र पोलिस कायदा कलम ३७ (१) १३५ अंतर्गत कारवाई होते. यामध्ये कडक शिक्षेची तरतूद आहे.

एकाच दिवसात दाखल झालेले गुन्हे

  • वाकडमधील वेणूनगर येथून अशोक मरिबा तुपेरे (वय २२, रा. म्हातोबानगर, वाकड रोड, वाकड ) याला कोयत्यासह अटक

  • थेरगाव येथून ओंकार ऊर्फ बंटी सुनील लोखंडे (वय २२, रा. भोंडे वस्ती, वाल्हेकरवाडी, चिंचवड) याला वाकड पोलिसांकडून अटक

  • सनी गौतम गवारे (वय २०, रा. गजानननगर, रहाटणी) याला काळेवाडीतील तापकीर मळा चौक येथून अटक

  • शुभम चंद्रकांत पांचाळ (वय २१, रा. सुदर्शन कॉलनी, नखातेनगर, रहाटणी ) याला काळेवाडीतील तापकीर चौकातून अटक.

  • हिंजवडीतील लक्ष्मी चौक येथून फ्रांसिस भास्कर दास (वय २९, रा. विनोदे वस्ती) याला हिंजवडी पोलिसांकडून कोयत्यासह अटक

  • विकास ऊर्फ विकी बाळू आडगळे (वय २२, रा. संजयनगर, ओटास्कीम, निगडी) याला संजयनगरमधून अटक

  • पिंपळे गुरवमधील सृष्टी चौक येथून केविन प्रकाश ब्राह्मणे (वय २२, रा. पिंपळे गुरव) याला सांगवी पोलिसांकडून कोयत्यासह अटक

  • जुनी सांगवी येथून हजरत इस्माईक अब्दुल रफिक शेख (वय २४, रा. मुळानगर, जुनी सांगवी) याला अटक

Web Title: Crime Update Pimpri Murder Case Attack Theft Scythe Pattern In City

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top