पिंपरी : रावण टोळीतील सराईत गुन्हेगाराला पिस्तुलासह अटक 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 25 September 2020

रावेत येथील वाल्हेकरवाडी रोडवरील एका हॉटेलसमोर एक जण थांबला असून, त्याच्याकडे पिस्तूल असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

पिंपरी : पिस्तूल व जिवंत काडतुसे बाळगल्याप्रकरणी पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या खंडणी व दरोडा विरोधी पथकाने रावण टोळीतील सराईत गुन्हेगाराला अटक केली. ही कारवाई रावेत येथे करण्यात आली. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

कुणाल चंद्रसेन गायकवाड (वय 22, रा. अजंठानगर, थरमॅक्‍स चौक, चिंचवड) असे आरोपीचे नाव आहे. रावेत येथील वाल्हेकरवाडी रोडवरील एका हॉटेलसमोर एक जण थांबला असून, त्याच्याकडे पिस्तूल असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार गुरूवारी (ता. 24) सायंकाळी पावणे पाचच्या सुमारास सापळा रचून गायकवाड याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे तीस हजार 400 रुपये किमतीचे एक पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे सापडली. गायकवाड रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, पिंपरी-चिंचवडमध्ये दहशत माजविणाऱ्या रावण टोळीचा सदस्य आहे. निगडी पोलिस ठाण्यात त्याच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: criminal arrested with a pistol from belonging to ravan gang