'पैसे दे नाही तर जिवंत सोडणार नाही'; पिंपरीत टोळक्याने माजवली दहशत

'तुझ्याकडे जेवढे पैसे आहेत तेवढे काढून दे, तुला जिवंत सोडणार नाही, तुला कार्यक्रम संपला, अशी धमकी देत कोयत्याचा धाक दाखवून रोकड लुटली.
crime
crimeSakal
Summary

'तुझ्याकडे जेवढे पैसे आहेत तेवढे काढून दे, तुला जिवंत सोडणार नाही, तुला कार्यक्रम संपला, अशी धमकी देत कोयत्याचा धाक दाखवून रोकड लुटली.

पिंपरी - 'तुझ्याकडे जेवढे पैसे (Money) आहेत तेवढे काढून दे, तुला जिवंत सोडणार नाही, तुला कार्यक्रम संपला, अशी धमकी (Warning) देत कोयत्याचा धाक दाखवून रोकड लुटली. (Loot) त्यानंतर घरासमोरील मोटारीची तोडफोड करीत टोळक्याने (Gang) दहशत (Panic) माजवली. हा प्रकार पिंपरी येथे घडला.

याप्रकरणी रामदास पोपट भिवरकर यांनी फिर्याद दिली आहे . त्यानुसार सुरज गायकवाड, सुप्रीम काळे, सज्जाक शेख, विनायक क्षीरसागर, नाईंटी, निलेश होळकर, अनिल उर्फ आणि या उर्फ संतोष गोरख जाधव यांना पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी मध्यरात्री फिर्यादीच्या घरी गेले. ' तुझ्याकडे जेवढे पैसे असतील ते आम्हाला काढून दे, नाहीतर तुला जिवंत सोडणार नाही, तुझा कार्यक्रम संपला' अशी धमकी दिली. आरोपी सुप्रीम काळे यांनी कोयत्याचा धाक दाखवून फिर्यादीच्या खिशातील रोकड काढून घेतली . तर इतर आरोपींनी फिर्यादीला शिवीगाळ व दमदाटी करीत घरासमोरील मोटारीचे तोडफोड केली. पिंपरी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com