पिंपरीमध्ये उद्या सायक्‍लोथॉन आणि वॉकेथॉन

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 30 September 2020

पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी अंतर्गत सायक्‍लोथॉन आणि वॉकेथॉन आयोजित केले आहे. चिंचवड स्टेशन येथील ऑटो क्‍लस्टर येथे उद्‌घाटन झाल्यानंतर काळेवाडी फाटा ते देहू-आळंदी बीआरटी रस्त्याने सायकलीन सुरू होईल. 

पिंपरी : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवड महापालिका आणि पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेड यांच्यातर्फे गुरुवारी (ता. 1) सायक्‍लोथॉन आणि वॉकेथॉन आयोजित केले आहे. चिंचवड येथील ऑटो क्‍लस्टर येथे महापौर उषा ढोरे यांच्या हस्ते सकाळी सात वाजता उद्‌घाटन होणार आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली.

 - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी अंतर्गत सायक्‍लोथॉन आणि वॉकेथॉन आयोजित केले आहे. चिंचवड स्टेशन येथील ऑटो क्‍लस्टर येथे उद्‌घाटन झाल्यानंतर काळेवाडी फाटा ते देहू-आळंदी बीआरटी रस्त्याने सायकलीन सुरू होईल. यात सहभागी होणाऱ्यांनी औंध-रावेत बीआरटी मार्गावरील काळेवाडी फाटा येथे जाऊन परत ऑटो क्‍लस्टरपर्यंत यायचे आहे. 

सायक्‍लोथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी महापालिकेच्या http://bit.ly/PCMCCyclothonReg या वेबसाईटवर नोंदणी करायची आहे. यासाठी कोणतेही प्रवेश शुल्क आकारले जाणार नाही. अधिक माहितीसाठी संपर्क महापालिकेचे कार्यकारी अभियंता प्रमोद ओंभासे यांच्याशी 9922501756 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन आयुक्त हर्डीकर यांनी केले आहे. 

सायक्‍लोथॉन आणि वॉकेथॉन उपक्रमाची माहिती देताना महापालिका आयुक्‍त हर्डीकर म्हणाले की, पिंपरी- चिंचवड शहराने केंद्र सरकारच्या गृहनिर्माण व शहरी विकास मंत्रालयाच्या "इंडिया सायकल्स फॉर चेंज' या उपक्रमामध्ये सहभाग घेतला आहे. पायी चालणाऱ्या अर्थात पादचारी व्यक्ती आणि सायकलस्वारांना सुरक्षित व सोईस्कर सुविधा पुरविणे, हा या उपक्रमाचा भाग आहे. त्याची सुरुवात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीचे औचित्य साधून पिंपरी-चिंचवड महापालिका आणि पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेड एक ऑक्‍टोबर, गुरुवार रोजी करणार आहे. या उपक्रमात शहरातील अधिकाधिक नागरिकांनी व सायकल प्रेमींनी सहभाग घ्यावा, असे आवाहन महापौर ढोरे आणि आयुक्त हर्डीकर यांनी केले आहे. 

राजसाहेबांच्या भेटीने मनसैनिकांना दहा हत्तींचे बळ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cyclothon and walkathon in Pimpri-Chinchwad tomorrow at 7 am