Cyclothon : पिंपरी-चिंचवडमध्ये सायकलस्वारांनी दिला सुरक्षिततेचा संदेश  

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 1 October 2020

नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

पिंपरी : पादचारी आणि सायकलस्वारांच्या सुरक्षिततेचा संदेश देण्यासाठी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवड महापालिका आणि पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेड यांच्यातर्फे गुरुवारी (ता. 1) सायक्‍लोथॉन आणि वॉकेथॉन आयोजित केले होती. त्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

निवृत्त झालेल्या ड्रायव्हर काकांसाठी अतिरिक्त आयुक्त स्वत: बनले ड्रायव्हर!

चिंचवड येथील ऑटो क्‍लस्टर येथे महापौर उषा ढोरे यांच्या हस्ते सकाळी सात वाजता उद्‌घाटन झाले. महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर उपस्थित होते. उद्‌घाटन झाल्यानंतर काळेवाडी फाटा ते देहू-आळंदी बीआरटी रस्त्याने सायकलिंग सुरू झाले. औंध-रावेत बीआरटी मार्गावरील काळेवाडी फाटा येथे जाऊन परत ऑटो क्‍लस्टरपर्यंत परत आले.

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

सायक्‍लोथॉन आणि वॉकेथॉन उपक्रमाची माहिती देताना महापालिका आयुक्‍त हर्डीकर म्हणाले, की पिंपरी-चिंचवड शहराने केंद्र सरकारच्या गृहनिर्माण व शहरी विकास मंत्रालयाच्या 'इंडिया सायकल्स फॉर चेंज' या उपक्रमामध्ये सहभाग घेतला आहे. पायी चालणाऱ्या अर्थात पादचारी व्यक्ती आणि सायकलस्वारांना सुरक्षित व सोईस्कर सुविधा पुरविणे, हा या उपक्रमाचा भाग आहे. त्याची सुरुवात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीचे औचित्य साधून पिंपरी-चिंचवड महापालिका आणि पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेड यांच्या वतीने झाली. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cyclothon and Walkathon were organized by Pimpri-Chinchwad Municipal Corporation and Pimpri-Chinchwad Smart City Limited