esakal | देवेंद्र फडणवीसांचा बदनामीकारक व्हिडिओ अपलोड करणारा होणार तडीपार

बोलून बातमी शोधा

Defamatory Video uploader of Devendra Fadnavis will outlawry}

दाखले याने दोन मार्चला युट्युबवर फडणवीस यांच्याबाबत आक्षेपार्ह व बदनामी करणारा मजकूर असलेला व्हिडिओ अपलोड केला. याचे पडसाद विधानसभेतही उमटले. दरम्यान, याप्रकरणी दाखले याच्या विरोधात ३७ वर्षीय महिलेने वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

देवेंद्र फडणवीसांचा बदनामीकारक व्हिडिओ अपलोड करणारा होणार तडीपार
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पिंपरी : राज्याचे विरोधी पक्षनेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी बदनामीकारक व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केल्याप्रकरणी युवराज भगवान दाखले (रा. तापकीरनगर, काळेवाडी) याला वाकड पोलिसांनी अटक केली. त्याच्यावर इतर ठाण्यातही गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे त्याच्यावर तडीपारीची कारवाई करणार असल्याचे पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी स्पष्ट केले.

दाखले याने दोन मार्चला युट्युबवर फडणवीस यांच्याबाबत आक्षेपार्ह व बदनामी करणारा मजकूर असलेला व्हिडिओ अपलोड केला. याचे पडसाद विधानसभेतही उमटले. दरम्यान, याप्रकरणी दाखले याच्या विरोधात ३७ वर्षीय महिलेने वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. व्हिडिओचा कुठलाही पुरावा नसताना तो अपलोड केला. यामुळे फिर्यादी महिला कार्यकर्त्या व पक्षातील इतर कार्यकर्त्यांच्या मनामध्ये असंतोष आणि रोष निर्माण झाला आहे. कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या गेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दाखले याने गंभीर आरोप या व्हिडिओच्या माध्यमातून केला होता. याप्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. शुक्रवारी (ता. ५) त्याला न्यायालयात हजर केले असता, त्याची जमिनीवर सुटका करण्यात आली. दरम्यान, दाखले याच्यावर यापूर्वीही विविध पोलिस ठाण्यात इतर गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यांचा विचार करता त्याच्यावर तडीपारीची कारवाई करणार असल्याचे पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा