पिंपरी-चिंचवड शहरातील अवैध धंदे बंद करण्याची मागणी - अण्णा बनसोडे

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 7 July 2020

पिंपरी शहरात पोलिसांच्या आशीर्वादाने सुरू असलेले अवैध धंदे तातडीने बंद करावेत, अशी मागणी आमदार अण्णा बनसोडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे. 

पिंपरी - शहरात पोलिसांच्या आशीर्वादाने सुरू असलेले अवैध धंदे तातडीने बंद करावेत, अशी मागणी आमदार अण्णा बनसोडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

निवेदनात म्हटले आहे की, शहरात मटका, जुगार, पत्त्यांचे क्‍लब, गुटखा, अवैध दारू विक्री, हुक्का पार्लर, मसाज सेंटरच्या नावाखाली चालणारा वेश्‍या व्यवसाय दिवसाढवळ्या चालविला जातो. त्यातून दिवसाची उलाढाल लाखांमध्ये असून पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय सुरू झाल्यानंतर त्यात वाढ होत आहे. पैसे घेतले जात असल्याने त्यांच्यावर कारवाई होत नाही.

'या' कार्यकर्त्याची श्रद्धा पाहून शरद पवारही झाले नि:शब्द!

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असून केवळ भ्रष्ट पोलिस अधिकाऱ्यांमुळे सरकारची जनमानसातील प्रतिमा मलिन होत आहे. अवैध धंद्यांना पाठबळ देणाऱ्या पोलिस आयुक्तांसह सर्वच अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची गरज आहे. बनसोडे यांनी शहरातील पोलिस ठाणे निहाय सुरू असलेल्या अवैध धंद्यांची यादी पवार यांच्याकडे निवेदनासोबत दिली आहे. गृहमंत्री व पोलिस महासंचालकांनाही निवेदन पाठविले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Demand for closure of illegal business in Pimpri Chinchwad city anna bansode