खरेदीचा त्यांना शौक आहे. कारण, त्यात माल मिळतो.

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 23 January 2021

'राज्य सरकारमधील तीन पक्षांच्या भांडणात आदिवासी समाज कल्याणकारी योजनांपासून वंचित राहात आहे. आदिवासी कल्याणासाठीच्या तांत्रिक समितीने लाभार्थींच्या बॅंक खात्यात पैसे जमा करण्याचे सुचविले आहे. मात्र, राज्य सरकारचा जोर खरेदीवर आहे. खरेदीचा त्यांना शौक आहे.

पिंपरी - 'राज्य सरकारमधील तीन पक्षांच्या भांडणात आदिवासी समाज कल्याणकारी योजनांपासून वंचित राहात आहे. आदिवासी कल्याणासाठीच्या तांत्रिक समितीने लाभार्थींच्या बॅंक खात्यात पैसे जमा करण्याचे सुचविले आहे. मात्र, राज्य सरकारचा जोर खरेदीवर आहे. खरेदीचा त्यांना शौक आहे. कारण, त्यात माल मिळतो. कोणाला किती माल मिळतो, यावरून तिन्ही पक्षांमध्ये भांडणे आहेत,' असा आरोप विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

भाजप अनुसूचित जमाती व आदिवासी मोर्चाचे प्रदेश पदाधिकारी व कार्य समितीची बैठक आणि कार्यकर्ता मेळाव्यात फडणवीस बोलत होते. भोसरीतील अंकुशराव लांडगे नाट्यगृहात झालेल्या मेळाव्याला महापौर उषा ढोरे, भाजप प्रदेश प्रभारी ओमप्रकाश धुर्वे, माजी मंत्री गिरीश महाजन, प्रदेश संघटनमंत्री विजयराव पुराणिक, महामंत्री श्रीकांत भारतीय, सचिव अमित गोरखे, अनुसूचित जमाती मोर्चा प्रदेशाध्यक्ष आमदार डॉ. अशोक उईके, खासदार डॉ. भारती पवार, खासदार अशोक नेते, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके आदी उपस्थित होते. 

उधार न दिल्याने चायनीज सेंटरची तोडफोड; बोपखेलमधील प्रकार 

फडणवीस म्हणाले, 'आदिवासी समाजावर असलेले 175 कोटींचे खावटी कर्ज राज्यात आमचे सरकार असताना माफ केले. पेसाअंतर्गत आदिवासी समाजाला थेट पद्धतीने अनुदान देण्यास सुरुवात केली. मात्र, आम्ही घेतलेले निर्णय आताच्या सरकारने बंद केले आहेत. हा अधिकार त्यांना कोणी दिला, या सरकारला फक्त खरेदीत रस आहे. थेट अनुदान नाकारून आदिवासी समाजासाठी वस्तू खरेदीचा घाट सरकारने घातला आहे. आदिवासी समाजाच्या योजना ठप्प आहेत.'' 

पिंपरी-चिंचवड शहरात 166 नवीन रुग्ण; तर ५ जणांचा मृत्यू

बसायला भरपूर जागा 
राज्य सरकारमधील तीनही पक्ष तीन वेगवेगळ्या दिशेला चालले आहेत. त्यामुळे राज्याची अवस्था वाईट झाली आहे. ते एकत्र असले, तरी त्यात घाबरण्यासारखे काही नाही. कारण, त्यांना बसायला जागा नाही. दोन सोफे ठेवले आहेत. एका सोफ्यावर तीन लोक बसले आहेत. आपण एकटेच बसणार आहोत. त्यामुळे आपल्याला बसायला भरपूर जागा आहे, अशी उपरोधिक टोमणा मारून फडणवीस म्हणाले, 'आपल्याला मोठ्या प्रमाणात राजकीय स्पेस मिळत आहे. हे नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीतून दिसून आले आहे. साडेपाच ते सहा हजार ग्रामपंचायतीत भाजपची सत्ता आली आहे. एक नंबरचा पक्ष झाला आहे. म्हणून घाबरून जाण्याचे कारण नाही.'

चोरीला गेलेले दागिने पुन्हा मिळाल्याचा विश्‍वासच बसत नाही

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Devendra Fadnavis comment on government