पिंपरी-चिंचवडमधील 68 जणांना डिस्चार्ज, तर दिवसभरात एवढे मृत्यू

टीम ई-सकाळ
Thursday, 18 June 2020

आज रात्री नऊपर्यंत एकूण पॉझिटिव्ह 1495

पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातील कोरोनाचा कहर सुरूच आहे. बुधवारी मध्यरात्रीपासून गुरुवारी रात्री नऊ वाजेपर्यंत 62 जणांना संसर्ग झाल्याचे आढळून आले. आज 68 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज रात्री नऊपर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 1495 झाली. आजपर्यंत एकूण 933 जण बरे झाले आहेत. तर 536 जण उपचार घेत आहेत. आज शहरातील दोन आणि शिरपूर धुळे येथील एका व्यक्तीचा मृत्यू झाला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप    

आज पॉझिटिव्ह आलेले रुग्ण पिंपरी, हिंद चौक पिंपळे निलख, शिवतीर्थ काळेवाडी, मोरेवस्ती चिखली, मोरवाडी, खंडोबामाळ, तानाजीनगर चिंचवड, अजंठानगर आकुर्डी, पिंपळे सौदागर, विद्यानगर चिंचवड, नवी सांगवी, पंचतारानगर आकुर्डी, भाटनगर, इंदिरानगर चिंचवड, आंबेडकरनगर पिंपरी, दत्तनगर चिंचवड, घरकुल चिखली, गांधीनगर पिंपरी, दापोडी, तुळजाभवानी कॉलनी थेरगाव, शिवशक्ती चौक भोसरी, वैभवनगर पिंपरी, नाशिक फाटा कासारवाडी, सोनगिरा विहार काळेवाडी, बौध्दनगर पिंपरी, जगताप डेअरी, बिजलीनगर चिंचवड, उद्यमनगर ‍पिंपरी, तापकीर चौक काळेवाडी, सिध्दार्थनगर दापोडी, विनायकनगर पिंपळे गुरव, यमुनानगर,कोकणेनगर, गवळीमाथा भोसरी, संभाजीनगर चिंचवड, मिलिंद नगर पिंपरी, गणेशनगर थेरगांव, मोरेवस्ती चिखली, कोंढवा, येरवडा, कान्हे, बोपोडी, हिंजवडी, सिंहगड रोड व देहूरोड येथील रहिवासी आहेत.

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आज मृत झालेले रुग्ण गुलाबनगर दापोडी (पुरुष, वय ६५ वर्षें), दिघी (पुरुष, वय ४३ वर्षें), शिरपुर धुळे (पुरुष, वय-६६ वर्षे) येथील रहिवासी आहे.

आज नढेनगर काळेवाडी, रमाबाईनगर पिंपरी, बौध्दनगर पिंपरी, केशवनगर चिंचवड, शाहुनगर, चिंचवड स्टेशन, साईबाबानगर चिंचवड, अजंठानगर आकुर्डी, सिध्दार्थ नगर दापोडी, विजयनगर काळेवाडी, आनंदनगर, माऊली चौक वाकड, दत्तनगर दिघी, शिवतिर्थ नगर काळेवाडी, चिखली, दिघीरोड भोसरी, वाल्हेकरवाडी, भीमनगर पिंपरी, साईबाबा नगर चिंचवड, सुदर्शन नगर, पिंपळे गुरव, गुलाबनगर दापोडी, गांधीनगर खराळवाडी, धनगर बाबा मंदीर रहाटणी,पिंपरी, दत्त मंदिर वाकड, नाणेकर चाळ पिंपरी, पिंपळे सौदागर, काटेनगर दापोडी, बेलठीका नगर थेरगाव, एम.बी.कॅम्प किवळे, चाकण, खडकी, ठाणे, सिंडगडरोड येथील रहिवासी असलेले रूग्ण 'कोरोनामुक्त' झाल्याने डिस्चार्ज देण्यात आला आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

पावसाळा सुरु झालेला असल्याने वैद्यकीय विभाग, पिं.चिं. मनपामार्फत सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येत की अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडु नये. तसेच पावसाचे पाण्यामुळे मास्क ओला होणार नाही याची काळजी घ्यावी व सोबत किमान एक तरी अतिरीक्त (Extra) मास्क ठेवावा.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Discharge of 68 persons from Pimpri-Chinchwad city