रेशनिंग वाटपात पिंपरीत सगळा सावऴागोंधळच सुरू

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 30 September 2020

रास्तभाव धान्य दुकानातील "ई - पॉस' मशिन दिल्या आहेत. परंतु टू जी इंटरनेट सुविधा दिल्यामुळे त्या बंद पडत आहेत. 

पिंपरी:  धान्य वाटपात पारदर्शकता निर्माण व्हावी यासाठी, रास्तभाव धान्य दुकानातील "ई - पॉस' मशिन दिल्या आहेत. परंतु टू जी इंटरनेट सुविधा दिल्यामुळे त्या बंद पडत आहेत. परिणामी शिधाधारकांचे अंगठ्याचे थंब होत नसल्याने शिधाधारक आणि दुकानदारांमध्ये वाद होत असल्याचे प्रकार समोर आले आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

पिंपरी चिंचवड शहरात 330 रास्त धान्य दुकानांची संख्या आहे. 1 लाख 10 हजार शिधापत्रिकाधारक आहेत. या मशिनद्वारे वितरण ग्राहकांना करण्यात येते. त्यासाठी प्रत्येकाला स्वतंत्र मशिन दिलेले आहेत. परंतु या मशिनमध्ये सातत्याने बिघाड होत असून या मशीनला 2 जी सीम कार्ड दिले असल्याने नेटवर्क मंदगतीने सुरू होते. कधी कधी नेटवर्कला रेंज येत नाही. मशिनचा सर्व्हर डाउन असल्यामुळे ई-पॉस मशिन कधी सुरू होते, तर कधी कधी हॅंग होते. परिणामी रांगेत थांबलेल्या शिधाधारकांना सायंकाळपर्यंत थांबावे लागले. यावरून ग्राहक व दुकानदारांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. 

राजसाहेबांच्या भेटीने मनसैनिकांना दहा हत्तींचे बळ

ऑल महाराष्ट्र रेशनिंग शॉपकीपर फेडरेशनचे अध्यक्ष गजानन बाबर म्हणाले, ""सर्वत्र जुने मशिन बसविलेले आहेत. 2जीचे सीम असल्याने खूप अडचणी येत आहेत. चांगले नेटवर्क दुकानदारांना मिळाल्यावर व वितरण प्रणाली मध्ये सुधारणा होईल. परिणामी ग्राहक व रास्त भाव दुकानदार यांच्यामध्येही वाद होणार नाही. यावर अन्न नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभागाने निर्णय घ्यावा.'' 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मशिनची वारंवार बॅटरी निकामी होणे, मशिनमध्ये बिघाड होणे याच्याही तक्रारी खूप वाढत आहेत. त्यामुळे दुकानदारांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. बिघाड झालेल्या मशिन तत्काळ बदलून देण्यात याव्यात. या मशिनचे नेटवर्क 2 जी वरून 4 जी करण्यात यावे. -विजय गुप्ता, रास्त धान्य दुकानदार 

परिमंडळ कार्यालय - रास्त दुकानांची संख्या - शिधा पत्रिकाधारकांची संख्या 
-"ज' परिमंडळ कार्यालय - 80 - 33 हजार 
-"अ' परिमंडळ कार्यालय - 120 - 34 हजार 
- "फ' परिमंडळ कार्यालय - 130 - 36 हजार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Disruption in ration distribution in Pimpri