पिंपरी-चिंचवड: ‘पंतप्रधान आवास’साठी सोमवारपासून कागदपत्र तपासणी 

पिंपरी-चिंचवड: ‘पंतप्रधान आवास’साठी सोमवारपासून कागदपत्र तपासणी 

पिंपरी : पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत महापालिकेमार्फत चऱ्होली, रावेत व बोऱ्हाडेवाडी येथे गृहप्रकल्प उभारण्याचे काम सुरू आहे. त्यातील सदनिकांची ऑनलाइन संगणकीय सोडत २७ फेब्रुवारी रोजी काढण्यात आली आहे. सोडतीमध्ये निवड झालेल्या लाभार्थ्यांच्या मूळ कागदपत्रांची तपासणी सोमवारपासून (ता. ८) सुरू करण्यात येणार आहे. लाभार्थ्यांनी झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभागात मूळ कागदपत्रांसह उपस्थित राहावे, असे आवाहन महापौर उषा ढोरे व आयुक्त राजेश पाटील यांनी केले आहे. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आवश्‍यक मूळ कागदपत्रे 
उत्पन्नाचा दाखला, जात प्रमाणपत्र, जात वैधता पडताळणी प्रमाणपत्र, बँक पासबुक, आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र, रहिवासी दाखला, भाडे करारनामा. नियमानुसार इतर आवश्यक कागदपत्रांची मागणी महापालिकेने केल्यास लाभार्थ्यांना ते सादर करावे लागतील. 

अशी होईल तपासणी 
अर्जासोबत सादर केलेला उत्पन्नाचा दाखला, महापालिका हद्दीत कोणतीही मिळकत नसल्याची तपासणी, ज्या राखीव प्रवर्गामध्ये अर्ज केला आहे, त्याच्या जात प्रमाणपत्राची तपासणी, या मूळ निकषाची पूर्तता झाल्यास सदनिकांचा लाभ देण्यात येईल. अन्यथा अपात्र ठरविण्यात येऊन त्या जागेवर प्रतिक्षा यादीतील प्रवर्ग निहाय लाभार्थ्यांस योजनेत सामावून घेण्यात येईल. 

कागदपत्र तपासणी वेळापत्रक 
(सकाळी ११ ते सायंकाळी ५) 

रावेत प्रकल्प : ९३४ लाभार्थी 

  • तारीख/ प्रवर्ग/निवड यादी क्रमांक 
  • ८/ एसटी- ११ ते १/ ८६९ ते ९३४ 
  • ८/ एससी- २.३० ते ५ /७४८ ते ८६८ 
  • ९/ ओबीसी/ ४६८ ते ६०८ 
  • १०/ ओबीसी/ ६०९ ते ७४७ 
  • १२/ सर्वसाधारण/ १ ते १५५ 
  • १३/ सर्वसाधारण/ १५६ ते ३१० 
  • १४/ सर्वसाधारण/ ३११ ते ४६७ 

बोऱ्हाडेवाडी प्रकल्प : १२८८ लाभार्थी 

  • तारीख/ प्रवर्ग/निवड यादी क्रमांक 
  • १५/ एसटी/ ११९८ ते १२८८ 
  • १६/ एससी/ १०३१ ते ११९७ 
  • १७/ ओबीसी/ ६४५ ते ८३८ 
  • १८/ ओबीसी/ ८३९ ते १०३० 
  • १९/ सर्वसाधारण/ १ ते २१५ 
  • २०/ सर्वसाधारण/ २१६ ते ४३० 
  • २१/ सर्वसाधारण/ ४३१ ते ६४४ 

चऱ्होली प्रकल्प : १४४२ 

  • तारीख/ प्रवर्ग/निवड यादी क्रमांक 
  • २२/ एसटी/ १३४२ ते १४४२ 
  • २३/ एससी/ ११५५ ते १२४७ 
  • २४/ एससी/ १२४८ ते १३४१ 
  • २५/ ओबीसी/ ७२२ ते ८६६ 
  • २६/ ओबीसी/ ८६७ ते १००९ 
  • २७/ ओबीसी/ १०१० ते ११५४ 
  • २८/ सर्वसाधारण/ १ ते १८० 
  • २९/ सर्वसाधारण/ १८१ ते ३६१ 
  • ३०/ सर्वसाधारण/ ३६२ ते ५४१ 
  • ३१/ सर्वसाधारण/ ५४२ ते ७२१ 
     

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com