कुणी प्लाझ्मा देता का प्लाझ्मा?

Plasma
Plasma

दिवसभरात दहा रुग्णांना पुरेल एवढाच साठा; दात्यांची नितांत गरज
पिंपरी - कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढल्याने प्लाझ्माची मागणी अचानक वाढली आहे. सध्या दिवसाला २०, तर महिन्यामध्ये ६००हून अधिक कोरोनाबाधितांना प्लाझ्माची गरज भासत आहे. मात्र, १० रुग्णांना पुरेल, इतकाच साठा दिवसभरात उपलब्ध होत आहे. कोरोनामुक्त झाल्यानंतर प्लाझ्मादानसाठी बहुतांश जण पुढे येत नाहीत. किचकट प्रक्रियेमुळे काहीजण टाळतात. परिणामी रुग्णांच्या नातेवाइकांची घालमेल होत असून, या उपचार पद्धतीला मर्यादा येऊ लागली आहे.

कोरोना रुग्णांसाठी ‘प्लाझ्मा थेरपी’ ही वरदान ठरत आहे. वर्षभरात एक लाख ६८४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, तरी आतापर्यंत महापालिकेच्या वायसीएम रक्तकेंद्रात अवघे दोन हजार ७६ प्लाझ्मा तयार करण्यात आला. त्यातून दोन हजार ५० रुग्णांवर उपचार केले आहेत. ‘एबी’ पॉझिटिव्ह व निगेटिव्ह ग्रुपच्या दात्यांचा अल्प प्रतिसाद मिळत आहे. ‘ए’ आणि ‘ओ’ या ग्रुपचा प्लाझ्मा उपलब्ध होत असला, तरी दात्यांचा शोध घ्यावा लागतो.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सद्यःस्थितीत तीन हजार ४२३ रुग्ण सक्रिय झाल्याने उपचारांसाठी प्लाझ्माचीही गरज वाढली आहे. शहराबरोबरच चाकण, राजगुरुनगर, खेड येथून मागणी होत आहे. प्लाझ्मा संकलित केलेल्या २०० मिलीच्या बॅगसाठी सरकारी दर साडेपाच हजार रुपये आहेत. परंतु, वायसीएम रक्तकेंद्रात अवघ्या ४०० रुपयात बॅग मिळते.

प्लाझ्मा दाते मागे का?
कोरोनामुक्त झाल्यानंतर पुन्हा आजार होण्याची भीती
प्लाझ्मादान करण्यापूर्वी चाचण्यांसाठीच लागतो अडीच तास वेळ
प्रक्रियेच्या जादा कालावधीमुळे दात्यांची दिवसभरातील संख्या कमी
दिवसभरात १० जणच प्लाझ्मादान करतात.

नियमावली  

  • १८ ते ६० वयोगटातील व्यक्ती 
  • हिमोग्लोबिन १२.५.५ टक्के असावे
  • वजन साधारणपणे ५५ किलोपेक्षा जास्त 
  • कोमॉर्बीडीटी नसावेत
  • कोरोनामुक्तांनी २८ दिवसानंतरच प्लाझ्मा दान करावा
  • प्लाझ्मा कोणत्या रुग्णाला द्यायचा हे डॉक्टर ठरवतात

प्लाझ्मादानसाठी नागरिक पुढे येत नाहीत हीच मोठी अडचण आहे. कोरोनामुक्त रुग्णांनी सामाजिक भावनेतून प्लाझ्मा दानाचा संकल्प करणे आवश्‍यक आहे. 
- डॉ. शंकर मोसलगी, रक्तसंक्रमण अधिकारी, वायसीएम रक्तकेंद्र

विविध भागांतील नगरसेवक, राजकीय नेते, तरुण मंडळांचे कार्यकर्ते, सामाजिक संस्था यांनी आपापल्या भागातील कोरोनामुक्त रुग्णांना प्लाझ्मादान करण्याचे आवाहन करावे.
- संजय गायखे, प्रहार रुग्णसेवक

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com