कुत्र्याच्या हल्ल्यात मुलाचा तुटला कान; दापोडीतील घटना

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 7 February 2021

पिंपरी शहरात मोकाट कुत्र्यांनी धुमाकूळ घातला आहे. आता पाळीव कुत्रेही चावत असल्याची घटना समोर आली आहे. दापोडीतील बापू काटे चाळीतील प्रणव प्रफुल्ल गायकवाड या सहा वर्षीय मुलावर कुत्र्याने प्राणघातक हल्ला केला.

पिंपरी - शहरात मोकाट कुत्र्यांनी धुमाकूळ घातला आहे. आता पाळीव कुत्रेही चावत असल्याची घटना समोर आली आहे. दापोडीतील बापू काटे चाळीतील प्रणव प्रफुल्ल गायकवाड या सहा वर्षीय मुलावर कुत्र्याने प्राणघातक हल्ला केला. लचक्‍यात त्याच्या कानाचा तुकडा पडला असून, उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल केले आहे.

निगडीतील गुन्हेगार 'चंडालिया' टोळीवर मोका 

गुरुवारी (ता. ४) सायंकाळी पाच वाजता प्रणव अंगणात मित्रांसोबत खेळत होता. तेवढ्यात शेजारील विक्रम कांबळे यांच्या पाळीव कुत्र्याने त्याच्यावर झडप घातली. आकस्मिक हल्ल्यामुळे त्याच्यासह मित्र किंचाळू लागल्याने आजूबाजूच्या लोकांनी धाव घेतली. त्याला कुत्र्याच्या तावडीतून सोडविले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

तोपर्यंत त्याच्या  हातापायाचा, कानाचे चावे घेतले होते. हल्ला इतका जोरदार होता की, काही काळ नागरिकही पुढे जाण्यास धजावले नाहीत. तरीही काहींनी धाडसाने प्रणवची सुटका केली. त्याच्या हातापायावर खोलवर जखमा झाल्या असून, कानाचा तुकडा पडला आहे. सुरुवातीला औंध रुग्णालयात हलविले; परंतु डॉक्‍टर नसल्यामुळे तेथे उपचार होऊ शकले नाहीत. त्यामुळे त्याला ससून रुग्णालयात हलविले. तिथे तात्पुरते उपचार करून घरी आणले आहे. आता पुन्हा त्याच्यावर उपचार सुरू करण्यात येणार आहेत. श्‍वानमालक कांबळे यांच्या विरोधात भोसरी पोलिसमध्ये तक्रार नोंद झाली आहे. 

आईची कबुतरावर मोहमाया; लेकाच्या साथीनं सावत्र मुलावर केला प्राणघातक हल्ला

कोवळ्या वयात मरणयातना 
प्रणव हा बोपोडीतील राजेंद्रप्रसाद इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये पहिलीत शिकतो. त्याच्या कुटुंबाची परिस्थिती बेताची असून, उपचाराचा खर्च न पेलवणारा आहे. अद्याप कान तज्ज्ञांनी तपासणी केलेली नाही. सोमवारी (ता. ८) उपचारांसाठी बोलविले आहे. त्यानंतरच कानाच्या आतील बाजूस किती प्रमाणात इजा झाली आहे, याचे निदान होईल.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dog attack on child ear injured dapodi