जिवाच्या आकांताने रात्रभर विव्हळणाऱ्या कुत्र्याची 15 फूट खोल खड्डयातून केली सुटका

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 19 September 2020

डांगे चौकात रस्त्याच्या कडेला खोदकाम सुरु आहे. 15 फूट खोदलेल्या खोल खड्डयात शुक्रवारी रात्री (ता. 18) एक कुत्रा पडला. जिवाच्या आकांताने तो रात्रभर विव्हळत होता. सकाळी नागरीकांनी अग्निशमन दलाच्या जवानांनाशी संपर्क केला. एक तासाच्या अथक प्रयत्नानंतर जेसीबी व दोरच्या सहाय्याने कुत्र्याची सुटका करण्यात आली.

पिंपरी - डांगे चौकात रस्त्याच्या कडेला खोदकाम सुरु आहे. 15 फूट खोदलेल्या खोल खड्डयात शुक्रवारी रात्री (ता. 18) एक कुत्रा पडला. जिवाच्या आकांताने तो रात्रभर विव्हळत होता. सकाळी नागरीकांनी अग्निशमन दलाच्या जवानांनाशी संपर्क केला. एक तासाच्या अथक प्रयत्नानंतर जेसीबी व दोरच्या सहाय्याने कुत्र्याची सुटका करण्यात आली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

खड्डयाच्या कडेने बॅरिकेटस नसल्याने हा प्रसंग घडल्याचे समजत आहे. रहाटणी अग्निशमन केंद्रातील जवानांनी सकाळी 11 ते 12 दरम्यान कुत्र्याची सुटका केली. जवानांकडेही खोल खड्डयात उतरण्यासाठी पुरेशी साधने नव्हती. शेवटी त्यांनी जवळच असलेल्या क्रेन चालकाची मदत घेतली. जेसीबीच्या सहाय्यनेही कुत्र्याला वर उचलता येणे अशक्‍य होते. त्यानंतर दोरचा फास लावून कुत्र्याला वर काढण्यात आले. नागरिकही यावेळी हळहळ व्यक्त करत होते. जेसीबी वाहनचालक मंगेश देवगडकर यांनी जवानांना मदत केली. जवान सोमनाथ थुकदेव, विठ्ठल घुसे, लक्ष्मण ओव्हाळे, अक्षय गायवाड यांनी कुत्र्याची सुटका केली.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dog barking night rescued 15 foot deep pit

Tags
टॉपिकस
Topic Tags: