Video : मेलेली जनावरे, दुर्गंधी अन् गटारगाळ ही आमची दिनचर्या

Shankarwadi-Dranage
Shankarwadi-Dranage

कोरोना संसर्गातही या स्वच्छतादूतांचा विसर :पूर संकट टाळण्यासाठी राबतायेत अनेक हात
पिंपरी - मेलेली जनावरे, दुर्गंधी आणि गटाराच्या गाळात कीडूक-मिडूक चावण्याची भीती असून देखील जीव मुठीत घेऊन स्वच्छतादूत पावसाच्या तोंडावर नाले सफाई करीत आहेत. 'नेमेची येतो मग पावसाळा' या मानसिकतेतून मेट्रो सिटीत नाले सफाई अद्यापही अत्याधुनिक पद्धतीने न होता परंपरागत पद्धतीने होते ही लाजिरवाणी बाब आहे. विविध प्रकल्पांवर करोडो रुपये खर्च होणाऱ्या शहरात मात्र, कोरोना महामारीत जीव धोक्‍यात घालून नालेसफाई करण्यासाठी अनेक हात राबत आहेत.

सध्या आठ क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत पिंपरी-चिंचवड शहरात एकूण छोटे-मोठे 17 नाले आहेत. एका नाल्याच्या ठिकाणी पाच ते सात कर्मचारी काम करीत आहेत. यामध्ये कंत्राटी कर्मचारी जवळपास 310 कर्मचारी काम करीत आहेत. चिंचवड स्टेशन, जाधववाडी येथील कृष्णानगर, रंगनाथनगर, चिंचवडगावातील प्रेमलोक पार्क जवळील नाला, शंकरवाडी, काळभोरनगरमधील सुदर्शननगर व तानाजीनगर नाला, रहाटणी, काळेवाडी, पिंपळे-सौदागर, दिघी, भोसरी-आळंदी या भागात मोठे नाले आहेत. यातील काही नाले अद्यापही बंदिस्त नाहीत. त्यामुळे झाडी-झुडपे, प्लॅस्टिक, गवत, बांधकामांची पोती, मेलेली जनावरे नाल्यात अडकली आहेत. नाल्यातून गाळ काढताना पाच ते सहा फूट खोल उतरावे लागत आहे. त्यासाठी जेसीबी प्रत्येक नाल्याच्या ठिकाणी असणे अत्यावश्‍यक आहे. मात्र, ही यंत्रणाही तुटपुंजी असल्याचे दिसत आहे.

नाले सफाई करताना ओढवते हे संकट
रस्त्यावर कचऱ्याचे ढिगारे टाकणाऱ्या नागरिकांच्या बेजबाबदारपणामुळे नाल्यात मोठ्या प्रमाणावर कचरा जमा होत आहे. यात सांडपाणी, औद्योगिक कंपन्याचे रसायनमिश्रित पाणी आण पावसाचे पाणी एकत्रित होत असल्याने या पाण्याचा रंगच काळा झालेला आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. नाले सफाईत गमबूट व हॅंडग्लोव्हज हे कर्मचारी वापरत आहेत, परंतु ते काम करताना हातातून गळून पडत आहेत. बऱ्याचदा पाण्यात वाहून देखील जातात. फावडे व इतर साहित्याच्या मदतीने पाण्यातील कचरा व गवत काढताना पाच ते सात कर्मचारी असूनही ओला झालेला जड गाळ उपसला जात नाही. कित्येकदा मेलेली जनावरेच हाती लागत असल्याचे प्रसंग घडूनही कर्मचारी पुन्हा त्याच नाल्यात उतरून कामाला सुरवात करत असल्याचे करूण प्रसंग समोर येत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com