esakal | पंतप्रधान आवास योजनेतील सदनिकांसाठी शनिवारी सोडत

बोलून बातमी शोधा

Home}

केंद्र सरकारच्या पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी चऱ्होली, रावेत व बोऱ्हाडेवाडी येथे गृहप्रकल्प उभारण्यात येत आहेत. त्यातील सदनिकांसाठीची सोडत शनिवारी (ता. २७) सकाळी ११ वाजता चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते काढण्यात येणार आहे.

पंतप्रधान आवास योजनेतील सदनिकांसाठी शनिवारी सोडत
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पिंपरी - केंद्र सरकारच्या पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी चऱ्होली, रावेत व बोऱ्हाडेवाडी येथे गृहप्रकल्प उभारण्यात येत आहेत. त्यातील सदनिकांसाठीची सोडत शनिवारी (ता. २७) सकाळी ११ वाजता चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते काढण्यात येणार आहे. या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहतील. अध्यक्षस्थानी महापौर उषा ढोरे राहतील, अशी माहिती सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी दिली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

महापालिकेने योजनेसाठी १७ ऑगस्ट ते १० ऑक्टोबर या कालावधीत नागरिकांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, दिव्यांग व इतर याप्रमाणे केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार आरक्षण असेल. तीन हजार ६६४ सदनिकांसाठीची निवड यादी व त्याच प्रमाणात प्रतीक्षा यादी तयार करण्यात येणार आहे. या प्रकल्पामध्ये सदनिकाधारकास प्रथम दहा टक्के स्वहिस्सा भरावा लागेल. या योजनेची सोडत पालिकेच्या फेसबुक पेजवर दाखविण्यात येणार आहे.

मास्क न लावल्याने पिंपरी-चिंचवड महापौरांच्या मुलावर गुन्हा!

नागरिकांना आवाहन
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी सोडतीच्या ठिकाणी उपस्थित न राहता महापालिकेने जाहीर केलेल्या www.facebook.com/pcmcindia.gov.in लाइव्ह व यू ट्यूब www.youtube.com/PCMCINDIA या लिंकवर जाऊन ऑनलाइन उपस्थित राहावे.

मोशी उपबाजारात हापूसचे आगमण 

दृष्टिक्षेपात अर्ज
४७,८७८ - एकूण अर्ज
४७,७०७ - पात्र अर्ज

सदनिका
१४४२ - चऱ्होली
९३४ - रावेत
१२८८ - बोऱ्हाडेवाडी
३६६४ - एकूण

Edited By - Prashant Patil