लॉकडाउनच्या पहिल्या दिवशी पेट्रोल पंपांवर झाला असा परिणाम

लॉकडाउनच्या पहिल्या दिवशी पेट्रोल पंपांवर झाला असा परिणाम

पिंपरी : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे पाच दिवसांचा लॉकडाउन असल्याने विविध व्यवसायाबरोबर अत्यावश्‍यक सेवा असलेल्या पेट्रोल पंपांवरही मोठा परिणाम झाला आहे. पेट्रोल पंप सुरू ठेवण्यात आले असले, तरी खरेदीला अत्यल्प ग्राहक असल्याने शहरात दररोज विक्री करण्यात येणारे लाखो लिटर इंधन विकले गेले नाही. परिणामी कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प झाली. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शहरात लॉकडाउन कडक केल्याने मोठा परिणाम इंधन विक्रीवर दिसून येत आहे. कोरोना उपाययोजनांची कडक अंमलबजावणी झाल्यामुळे वाहने रस्त्यावर येत नाही. पेट्रोल, डिझेल व सीएनजी पुरवठा हे अत्यावश्‍यक सेवेमध्ये मोडतात. मात्र, केवळ शासकीय वाहने आणि अत्यावश्‍यक सेवा असलेल्या वाहनांनाच सकाळी 9 ते सायंकाळी 6 या वेळेत पेट्रोल- डिझेल देणार, असा फलक पेट्रोलपंप चालकांनी लावला होता. काही वाहनधारक नऊ वाजण्याची वाट पाहत पेट्रोलपंपासमोरच थांबले होते. त्यामुळे अतिशय अपवादात्मक स्थितीत पेट्रोलपंप बंद ठेवण्याचा निर्णय घेतला जातो. सध्या पेट्रोलसाठी गर्दी होऊ नये, याची दक्षता घेतली गेली आहे. 

शहरात विविध कंपन्यांचे अंदाजे 40 पेट्रोल पंप कार्यरत आहेत. त्यांच्याकडे पुरेसा इंधन साठा आहे. बंदमुळे दिवसभरात अत्यावश्‍यक सेवेतील कर्मचारी वगळता कुणी इंधन खरेदीसाठी आलेले नाही. त्यामुळे इंधन विक्री ठप्प झाली. पंप सुरू ठेवण्यात येणार असून, नागरिकांची गर्दी होऊ नये याची दक्षता घेतली जात आहे. प्रत्येक पेट्रोलपंपावर दुचाकी, चारचाकी चालकांची विचारपूस करण्यात येत आहे. त्यांची कागदपत्रे तपासूनच त्यांना इंधन देण्यात येत आहे. गेल्या तीन महिन्यापासून कोरोनामुळे महाविद्यालयातील विद्यार्थी वाहतूक करणारे बस, औद्योगिक क्षेत्रातील वाहने, खासगी वाहने, ट्रॅव्हल, रिक्षा, खासगी बस सेवा, टॅक्‍सी सेवा बंद आहे. त्यामुळे त्याचा परिणाम इंधन विक्रीवर झाला आहे. त्यामुळे मागील फेब्रुवारी महिन्याच्या तुलनेत अधिक तूट झाल्याचे इंधन विक्रेत्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com