ek muth dhanya bhukelyansathi campaign Participation of 53 societies in Pimple Saudagar
ek muth dhanya bhukelyansathi campaign Participation of 53 societies in Pimple Saudagarsakal

भुकेल्यांसाठी ‘एक मूठ धान्याची’ पिंपळे सौदागरमधील ५३ सोसायट्यांचा अभियानात सहभाग

५३ सोसायटी व्यवस्थापन व सहभागी सदस्य या संकलनात ज्वारी, गहू, तांदूळ, डाळ आदींचे संकलन

जुनी सांगवी : आपल्या सभोवताली कुणीही उपाशी राहू नये, या संकल्पनेतून पिंपळे सौदागर येथील चारजणांनी एका सोसायटीमधून सुरू केलेल्या ‘एक मूठ धान्य भुकेल्यांसाठी’ या अभियानात आज ५३ सोसायट्या सहभागी झाल्या आहेत.हे संकलित करण्यात आलेले धान्य पुणे जिल्हा व परिसरातील विनाअनुदानित आश्रम शाळा, शाळा व शैक्षणिक संस्था, निवासी वसतिगृह व विद्यार्थ्यांना शैक्षणिक उपक्रम राबविणाऱ्या संस्थांमधील शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी वितरित करण्यात येते. या सेवा कार्याची सुरवात २५ जुलै २०२१ पासून पिंपळे सौदागर येथील साई मेरिगोल्ड, पूर्वा रेसिडेन्सी व गणेश रेसिडेन्सी येथून विनोद पाटील व त्यांच्या सहकारी मित्रांनी मिळून सुरू केली. आता या अभियानात २८० कार्यकर्ते जोडले आहेत.

यात ४७ महिलांचा सहभाग आहे. एका मुलाला साधारण दोनशे ते तीनशे ग्रॅम जेवण लागते. या संकल्पनेतून महिन्यातून एका घरातून एका विद्यार्थ्यांचे जेवण अर्थातच एक मूठ धान्य संकलन अभियान सुरू करण्यात आले. सुरवातीला पंधरा ते वीस मुलांना महिन्याभराची जेवणाची व्यवस्था होईल इतके धान्य संकलित करण्यात आले. मात्र, आजमितीस पाचशेहून अधिक विद्यार्थ्यांची जेवणाची व्यवस्था यातून होत आहे. सुरवातीला चारशे घरापर्यंत हे अभियान पोचले. सध्या १४ हजार घरांमधून या धान्य संकलनास हातभार लागत आहे. आतापर्यंत वीस हजार किलो संकलित धान्य विविध संस्थांना वितरित करण्यात आले आहे. यातूनच प्रत्येक सोसायटीमधून बाल संस्कार वर्गाची सुरवात या उपक्रमातून करण्यात आली. या अभियानात विनोद पाटील, विशाल पदमवार, संजय राठोड, संदीप काळे, संदीप गुंजाळ, प्रीतम मारावार, दीपक शिंदे, राहुल अरमरकर, संतोष साहू आदी काम करतात.

असे चालवले जाते अभियान...

  • प्रत्येक सोसायटीमधून महिन्यातून एकदा प्लास्टिक बकेट ठेवल्या जातात.

  • ५३ सोसायटी व्यवस्थापन व सहभागी सदस्य या संकलनात ज्वारी, गहू, तांदूळ, डाळ आदींचे संकलन

  • सर्व सोसायट्यांमधून कार्यकर्त्यांमार्फत संकलित धान्य एकत्रित करण्यात येते.

  • आतापर्यंत वीस हजार किलो धान्य संकलित करून वितरित करण्यात आले.

  • मागणीनुसार परिसरातील शैक्षणिक संस्था, निवासी वसतिगृह, आश्रमशाळा यांना वितरण करण्यात येते

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com