आधी विजेनं अन् आता पाण्यानं केलं हैराण; पिंपळे सौदागर, रहाटणीतील समस्या

आधी विजेनं अन् आता पाण्यानं केलं हैराण; पिंपळे सौदागर, रहाटणीतील समस्या

पिंपरी : पिंपळे सौदागर, रहाटणीच्या काही भागांत दिवसभरात वारंवार वीजपुरवठा खंडित होत असतानाच तेथील रहिवाशांना आता विस्कळीत पाणीपुरवठ्याच्या समस्येलाही तोंड द्यावे लागत आहे. रविवारी केवळ 40 मिनिटेच पाणी आल्याने रहिवाशांच्या तोंडचे 'पाणी' पळाले आहे. त्यामुळे तेथील सोसायट्यांना पाण्याचे टॅंकर मागवावे लागले आहेत. 

गेल्या तीन दिवसांपासून पिंपळे सौदागर, रहाटणीच्या काही भागांत पाणीपुरवठ्याची समस्या निर्माण झाली आहे. सध्या दिवसाआड पाणीपुरवठा होत असताना पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने स्थानिक नागरिक हैराण झाले आहेत. गुरुवारी पालिकेच्या 'ड' क्षेत्रीय कार्यालयाच्या पाणीपुरवठा विभागाने देखभाल दुरुस्तीसाठी पाणीपुरवठा बंद ठेवला होता. तेव्हापासून पाणीपुरवठा व्यवस्थित होत नसल्याने तेथील सोसायट्यांमधील रहिवाशांना पिण्याच्या पाण्याची समस्या अधिक जाणवू लागली. त्यामुळे काही सोसायट्यांना पाण्याचे टॅंकर मागविणे भाग पडले. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोकणे चौक परिसरातील पार्क रॉयल सोसायटीचे सचिव उदय साबदे म्हणाले, "आमच्या सोसायटीत 433 फ्लॅटस्‌ असून, जवळपास 1600 लोक राहतात. पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने गुरुवारी देखभाल-दुरुस्तीसाठी आमच्या भागांतील पाणीपुरवठा बंद ठेवला. परंतु, दुसऱ्या दिवशी कमी दाबाने केवळ अर्धा ते एक तासभर पाणीपुरवठा झाला. सध्या दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्याने शनिवारी पाणीपुरवठा झाला नाही. मात्र, रविवारी दुपारी 12.40 वाजता पाणी आले आणि दीड वाजण्याच्या सुमारास पाणीपुरवठा बंद झाला. त्यामुळे आम्हाला शनिवारी 15, तर रविवारी 9 पाण्याचे टॅंकर मागवावे लागले. याशिवाय, आमच्या भागांतील वीजपुरवठाही दिवसभरातून 2 ते 3 वेळा खंडित होत आहे. आम्ही त्याबाबत स्थानिक नगरसेवकांनाही कळविले आहे. याच परिसरातील पार्क रॉयल सोसायटी, लिऑन ऑर्बिट, आकाशगंगा आदी सोसायट्यांनाही पाणीपुरवठ्याची समस्या जाणवत आहे.'' 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

'ड' क्षेत्रीय कार्यालयाचे उपअभियंता (पाणीपुरवठा) भाऊसाहेब साबळे म्हणाले, "कोकणे परिसरातील जलवाहिनी देखभाल-दुरुस्तीसाठी गुरुवारी बंद ठेवण्यात आली होती. शुक्रवारी एअरलॉकमुळे तेथे पाणीपुरवठ्याची समस्या उद्‌भवली. त्याबाबतच्या तक्रारीही माझ्याकडे आल्या. वेळापत्रकानुसार सोमवारी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. मात्र, आमचे कर्मचारी तेथे जाऊन समस्या सोडविण्याच्यादृष्टीने पाहणी करतील.''

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com