पुणे पदवीधर मतदारसंघाच्या मतदारयादीत या आहेत चुका 

पुणे पदवीधर मतदारसंघाच्या मतदारयादीत या आहेत चुका 

पिंपरी : पुणे पदवीधर मतदारसंघाच्या मतदारयादीत असंख्य चुका आहेत. एकाच मतदाराचे नाव एकापेक्षा जास्त वेळा प्रसिद्ध करणे, उमेदवाराचे आणि त्याच्या वडिलांचे नाव एकच असणे, उमेदवाराच्या जागी वडिलांचे नाव असणे अशा असंख्य चुका आहेत.

पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जुलैमध्ये होणे अपेक्षित होते. मात्र, कोरोनामुळे आता ऑगस्ट किंवा सप्टेंबरमध्ये होण्याची शक्‍यता आहे. या निवडणुकीसाठी मतदारांनी ऑनलाइन पद्धतीनेही नोंदणी केली आहे. त्यांची यादी अद्याप प्रसिद्ध झालेली नाही. दुसरीकडे सध्याच्या यादीत अनेक चुका आहेत. आतापर्यंत यादीत झालेल्या चुकांची दुरुस्ती होणे अपेक्षित होते. मात्र, निवडणूक आयोगाकडून ते कामही झालेले नाही. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मतदाराच्या नावाचे स्पेलिंग चुकीचे असणे, मतदाराचे नाव आणि त्याच्या वडिलांचे नाव एकच असणे, एकाच मतदाराचे नाव एकापेक्षा जास्त वेळा प्रसिद्ध होणे अशा अनेक प्रकारच्या चुका आहेत. या कामासाठी काही राजकीय पक्षांनी त्यांचे आमदार, नगरसेवक यांना कामाला या मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार युवराज पवार यांनी सांगितले. यासंदर्भात युवराज पवार यांनी सांगितले, "पुणे पदवीधर मतदारसंघात पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर हे पाच जिल्हे येतात. डिसेंबर 2019 अखेरपर्यंत एकूण तीन लाख 60 हजार मतदारांची नोंदणी झाली होती. त्यानंतर ऑनलाइन पद्धतीने मतदार नोंदणी केलेल्यांची यादी प्रसिद्ध झाली नाही.''

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com