पिंपरी-चिंचवडकरांनो खरेदीसाठी तुमची बाजारपेठ कधी सुरू असेल...पाहा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 मे 2020

शहरातील बाजारपेठेत खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांना आता नव्या नियमांचे पालन करावे लागणार आहे. 

पिंपरी : लॉकडाउनच्या चौथ्या टप्यात पिंपरी-चिंचवडचा रेड झोनमध्ये असणारा समावेश काढून टाकण्यात आला असला, तरी शहरातील बाजारपेठेत खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांना आता नव्या नियमांचे पालन करावे लागणार आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरोनाचे संकट कायम असल्यामुळे शहरातील बाजारपेठांमधील दुकाने उघडण्यासाठी सम-विषम पद्धतीचा वापर करण्यात येणार आहे. ज्यादिवशी सम तारखेची दुकाने खुली असतील, त्यादिवशी विषम तारखेची दुकाने बंद राहणार आहेत. ज्या भागातील दुकाने बंद असतील, त्याठिकाणी खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांनी वाहनांचे पार्किंग करायचे आहे. कंटेन्मेंट झोनमधली येणारी दुकाने ही पूर्णपणे बंद राहणार आहेत. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

महापालिकेने शहरातील बाजारपेठांची 15 क्षेत्रांमध्ये विभागणी केली आहे... 

 • चिंचवड स्टेशन 
 • पिंपरी कॅम्प, साई चौक, शगुन चौक 
 • गांधी पेठ, चापेकर चौक, चिंचवड 
 • काळेवाडी मुख्य रस्ता, (एसएमपूल ते काळेवाडी नदीवरील पूल) 
 • अजमेरा कॉलनी, पिंपरी 
 • मोशी चौक, मोशी आळंदी रोड, 
 • प्रताप चौक, निगडी बसस्टॉप 
 • डांगे चौक ते काळेवाडी फाटा 
 • भोसरी-आळंदी रोड 
 • कावेरीनगर मार्केट 
 • कस्तुरी मार्केट, थरमॅक्‍स चौक ते साने चौक 
 • दिघी जकात नाका ते मॅगझीन चौक, साईबाबा मंदिर 

या भागातील बाजारपेठा सम-विषम तारखेनुसार सकाळी नऊ ते सायंकाळी पाच यावेळेत सुरू राहणार आहेत. दुकानदारांना दुकाने सुरू करण्यासाठी परवानगी घेण्याची आवश्‍यकता नसल्याचे महापालिकेकडून कळविण्यात आले आहे.  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Even Odd method used to open shops at pimpri chinchwad city