लोणवळ्यात पर्यटकांना करता येणार खाजगी बंगल्यांमध्ये निवास; हाॅटेलव्यवसायास बसणार फटका

Exemption for MTDC licensee and commercial tax paying bungalows
Exemption for MTDC licensee and commercial tax paying bungalows

लोणावळा : लोणावळा नगरपरिषद हद्दीतील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या 'निवास आणि न्याहारी' योजनेचा परवाना घेतलेले व 'व्यावसायिक कर' भरणाऱ्या बंगले धारकांना व्यावसायिक वापरासाठी असलेले निर्बंध उठविण्यात आले आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मावळचे प्रांताधिकारी संदेश शिर्के यांनी सुधारीत आदेश दिले. कोविड १९ चा संसर्ग व प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून लोणावळा नगर परिषद हद्दीतल खासगी बंगले पर्यटकांना भाड्याने देण्यावर निर्बंध घातले होते. अनलाॅक चौथ्या टप्प्यात हाॅटेल, रिसाॅर्टस पर्यटकांसाठी खुले करण्यात आले. स्वतंत्र खासगी बंगल्यामध्ये अशी कोणतीही यंत्रणा नाही. याठिकाणी कुणीही वास्तव्यास येऊ शकते. कोरोनाचा प्रसार होऊ शकतो. त्यामुळे बंगले भाड्याने देणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत होती. यापार्श्वभूमीवर लोणावळ्यातील बंगले पर्यटकांना भाड्याने देणे गुन्हा असून बंगले भाड्याने देणारे बंगल्यांचे चालक-मालकांवर कारवाई करण्याचा इशारा प्रांताधिकारी संदेश शिर्के यांनी दिला होता.

लोणावळा परिसरात एमटीडीसीची परवानगी घेतलेले जवळपास पन्नास बंगले व हाॅटलचालक आहे. काही बंगले धारकांनी यासंदर्भात दाद मागितली होती. केंद्र आणि राज्य सरकारची मार्गदर्शक सूचनांनुसार लोणावळा नगरपरिषद हद्दीतील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या 'निवास आणि न्याहारी'चा परवाना, इतर आवश्यक परवानग्या घेतलेले बंगले, व्यावसायिक कर भरणारे बंगले यामध्ये पर्यटकांना राहण्यास परवानगी देण्यात आली. व्यावसायिक बंगलेधारकांना पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून याठिकाणी सॅनिटायझेशन यंत्रणा, सुरक्षेच्या उपाययोजना करण्यात यावी असे आदेश प्रांताधिकारी शिर्के यांनी दिले.  

लोणावळ्यात जवळपास १६ हजार मालमत्ता धारक आहेत. बहुतांशी बगंल्यांचा व्यावसायिक वापरासाठी वापर होत पर्यटकांना भाड्याने देण्यात येतात.  हाॅटेल्स, रिसाॅर्ट व्यवसायास मोठा फटका बसत असल्याने काही हाॅटेल व्यावसायिकांच्याही तक्रारी होत्या. बंगल्यांमध्ये वास्तव्यादरम्यान कसलीही नोंद ठेवली जात नाही. कदाचित त्यामुळे अनैतिक व्यवहारांना चालना मिळते. व्यावसायिक वापरासाठी वापर होत असल्याने नगरपरिषदेचे उत्पन्न बुडत असल्याने नगरपरिषदेच्यावतीने कारवाईचा बडगा उचलला जात आहे. तर दुसरीकडे पोलिसही कारवाई करतात. मात्र सेटलमेंट, सोयिस्कर होणाऱ्या कारवाईमुळे नागरिकांच्या तक्रारी वाढत आहे. तीन दिवसांपूर्वी तुंगार्ली येथील बंगला भाड्याने देणाऱ्या केअरटेकरवर गुन्हा दाखल झाला. मात्र बंगल्यात गोंधळ घालणाऱ्या पर्यटकांना मोकळे सोडण्यात आले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com