Chinchwad Bypoll Election : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटातील ८ पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी Expulsion of 8 office bearers of Thackeray group they help rebel candidate Rahul Kalate in the bypoll election | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chinchwad Bypoll Election

Chinchwad Bypoll Election : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटातील ८ पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी

पुण्यातील कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुका जाहीर झाल्यापासून या राज्यभर चर्चेचा विषय ठरल्या आहेत. या पोटनिवडणुकीमध्ये महाविकास आघाडीने उडी घेतल्यामुळे या दोन्ही निवडणुका चुरशीच्या होणार असल्याचं दिसून येत आहे. तर या दोन्ही निवडणुकांचा प्रचार सुरू असतानाच शिवसेनेचा ठाकरे गट चिंचवडमध्ये आक्रमक झाल्याचे दिसून आले आहे.

चिंचवडमध्ये भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर चिंचवड विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीसाठी २६ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. हा आठवडा प्रचाराचा शेवटचा आठवडा असतानाच आता चिंचवडमध्ये एक मोठी राजकीय घडामोड घडली आहे.

चिंचवडमध्ये भाजपच्या अश्विनी जगताप, महाविकास आघाडीचे नाना काटे आणि शिवसेना (ठाकरे गट) पक्षातून बंडखोरी करत अपक्ष अर्ज उमेदवारी अर्ज दखल केलेल्या राहुल कलाटे यांच्यात तिरंगी लढत होणार आहे. राहुल कलाटे यांच्या बंडखोरीमुळे महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढली असताना आता राहुल कलाटे यांना मदत करणाऱ्या शिवसैनिकांवर उद्धव ठाकरे यांनी कारवाईचा बडगा उगारला आहे.

चिंचवड पोटनिवडणुकीत शिवसेना पक्षाच्या आदेशाविरोधात काम केल्यामुळे ठाकरे गटाच्या महिला संघटिका अनिता तुतारे यांच्यासह आठ जणांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. आदित्य ठाकरे हे आज चिंचवडमध्ये नाना काटे यांच्या प्रचारासाठी भव्य रोड शो करणार आहेत. त्यापूर्वीच ठाकरे गटाकडून चिंचवडमध्ये ही मोठी कारवाई केली आहे.

शहराध्यक्ष सचिन भोसले यांनी मुंबईमध्ये उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आणि पक्षविरोधी काम करणाऱ्यांची यादी त्यांच्याकडे सोपवली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या आदेशानंतर शहराध्यक्ष सचिन भोसले आणि जिल्हाप्रमुख गौतम चाबुकस्वार यांनी ही मोठी कारवाई केली आहे.